मालेगाव कॅम्प कॉलेज रोडरील सराफी दुकानात दरोडा

कॅम्प कॉलेज रस्त्यावरील ब्रह्मा कॉम्प्लेक्समधील शरद नामदेव दुसाने ज्वेलर्समध्ये मध्यरात्री घरफोडीचा प्रकार घडला.
malegaon crime
malegaon crime esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कॅम्प कॉलेज रस्त्यावरील ब्रह्मा कॉम्प्लेक्समधील शरद नामदेव दुसाने ज्वेलर्समध्ये मध्यरात्री घरफोडीचा प्रकार घडला. चोरट्यांनी दुसाने ज्वेलर्स शोरुमचे शटर, खटकी, कुलूप तोडून दुकानातील सोन्या-चांदीचा ऐवज, रोख रक्कम, दोन सीसीटीव्ही कॅमेरे, असा सुमारे २१ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. वर्दळीच्या रस्त्यावर व थेट ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. याच रस्त्यावरुन गेल्या काही महिन्यात अनेक दुचाकी चाेरीला गेल्या. तर काही महिलांचे दागिने लुटण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी रोष व्यक्त केला जात आहे.

कॉलेज रस्त्यावर केबीएच हायस्कुलजवळील कस्तुरी बुकडेपो ते डिके चौक पर्यंत असंख्य व्यापारी संकुल आहेत. याच मार्गावर प्रयास हॉस्पिटल असल्याने रात्रंदिवस वर्दळही असते. दुसाने ज्वेलर्सच्या शोरुमचे चॅनल गेटचे लॉक तोडून शटर वाकवून व कुलूप तोडून चोरट्यांनी चारशे ग्रॅम वजनाचे १८ लाख ७२ हजाराचे दागिने, सुमारे ५० हजार रुपये किंमतीची एक किलो मोड असलेली चांदी, तीन हजार रुपये किंमतीचे दोन कॅमेरे, अडीच लाख रुपये रोख असा सुमारे २१ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पहाटे घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

malegaon crime
मालेगाव शहरातील गटार, नाल्यांवरील 350 अतिक्रमणांवर हातोडा

घरफोडी संदर्भात माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक एच. एस. देशमुख, एस. बी. मोरे आदींसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही प्राचारण केले. श्‍वान पथकाने रस्त्यावर चारचाकी गाड्या उभ्या असणाऱ्या ठिकाणापर्यंत माग दाखविला. त्या पार्श्वभूमीवर चोरटे चारचाकी वाहनातून आल्याचा संशय व्यक्त होत आहे. शरद दुसाने (६५, रा. भद्रकाली मार्केट पाच कंदिल) यांच्या तक्रारीवरुन कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

malegaon crime
बोगस बियाणे, औषधे, खते विक्रेत्यांवर कारवाई करावी; शेतकऱ्यांची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com