(टुडे पान एक मेन लिड)
‘रोहयो’च्या १२ हजार कामांमधून २२ हजार मजुरांना रोजगार
जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊन स्थलांतराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६४३ ग्रामपंचायतीपैकी ६३१ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२ हजार २८३ कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांच्या माध्यमातून २२ हजार ६३३ मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित १२ ग्रामपंचायतींमध्ये सध्या एकही काम सुरू नाही. या योजनेंतर्गत विविध विभागांच्या समन्वयातून गावोगावी सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
-------
या योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीची १६८ आणि कंपार्टमेंट बंडिंगचे एक काम सुरू आहे. वनविभागामार्फत रोपवन ६०, रोपवाटिका सहा, एलबीएस तीन आणि सीसीटीचे एक काम सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीची ५७, वृक्षलागवडीची चार आणि रोपवाटिकांची सहा कामे सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची ६४ आणि पेव्हर ब्लॉकची तीन कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतींमार्फत घरकुलांची ११ हजार ३१७, बांबू लागवडीची २४८, सिंचन विहिरींची १९१, रस्त्यांची १९, वृक्षलागवडीची २४, पेव्हर ब्लॉकचे एक, अस्तरीकरण शेततळ्यांची १०, गुरांच्या गोठ्यांची १०, जलतारा शोषखड्ड्यांची १०, शेळीपालन शेडची सहा, अंगणवाडीची दोन आणि गाळ काढण्याचे एका ठिकाणी काम सुरू आहे. तसेच, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची ५७, पेव्हर ब्लॉकची १४ आणि इतर विविध कामांचा समावेश आहे.
-----------
कोट-----
ग्रामीण मजुरांच्या रोजगारासाठी जिल्हा प्रशासनाने ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’ हेल्पलाईन क्रमांक (०२५६४- २९९५४४) कार्यान्वित केला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामस्थास किंवा मजूर बांधवास रोजगाराची आवश्यकता असल्यास अथवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
- डॉ. मिताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार
--------
बॉक्स करावा ---
तालुका----------कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायती-------कामांची संख्या----मजुरांची उपस्थिती
अक्कलकुवा----------७८----------------------------२,९९८----------५,२३१
अक्राणी--------------८८----------------------------१,४८६----------३,६३६
नंदुरबार--------------१३७---------------------------२,४४१----------३,८५३
नवापूर---------------११४---------------------------२,०५१----------४,०९०
शहादा---------------१४९---------------------------२,३२७----------३,६०४
तळोदा---------------६५----------------------------९८०------------२,२१९