शनिवारी धुळ्यात निवड चाचणी

शनिवारी धुळ्यात निवड चाचणी
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.... -- राज्यस्तरीय रोलर स्केटींगसाठी शनिवारी धुळ्यात निवड चाचणी -- कॉड्स व इनलाईन प्रकारात होणार स्पर्धा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : स्केटींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सॅम) यांच्या वतीने विरार (जि. पालघर) येथील अमेय स्केटींग क्लब येथे राज्यस्तरीय रोलर स्केटींग चॅम्पियनशिप २०२६ चे होणार आहे. या स्पर्धेत चार ते सहा नोव्हेंबरदरम्यान ६-८, ८-१० व १०-१२ वयोगटातील आणि १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान १२-१५, १५-१८ व १८ वर्षांवरील मुला-मुलींच्या कॉड्स व इनलाईन प्रकारात स्पर्धा पार पडणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ पाठवण्यात येणार असून, जिल्हा ॲमॅच्युअर रोलर स्केटींग असोसिएशनतर्फे शनिवारी (ता. ३१) दुपारी तीनला जिल्हा क्रीडा संकुल स्केटींग प्रशिक्षण केंद्र येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी होणार आहे. - इच्छुक खेळाडूंनी शनिवारी सकाळी दहाला कुशाग्र स्पोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्टेडीयम येथे नाव नोंदणी करून चाचणीत सहभागी व्हावे. चाचणीला येण्यापूर्वी खेळाडूंनी RSFI च्या www.indiaskate.comया संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तसेच सोबत RSFI रजिस्ट्रेशन फॉर्मच्या दोन कलर कॉपी, आधार कार्डाची प्रत, कलर फोटो असलेले स्कूल बोनाफाईड सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेट आणावे, असे आवाहन जिल्हा ॲमॅच्युअर रोलर स्केटींग असोसिएशनतर्फे अजय चौरसिया यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com