

Withdraw Tax Proposal on Rooftop Solar: Former MLA Deepika Chavan's Firm Demand
Sakal
सटाणा : राज्य सरकारकडून छतावरील सौरऊर्जेवर वीज कर लावण्याच्या प्रस्ताव म्हणजे सौरऊर्जा वापरणाऱ्या लाखो ग्राहकांची उघडपणे फसवणूक आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खासगी कंपन्यांचे भले करण्यासाठी राज्यातील भाजपा महायुती सरकारकडून आपल्या घरावर सौरऊर्जा बसवलेल्या ग्राहकांच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे. राज्य शासनाने हा अन्यायकारक प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी केली आहे.