NSK26H33645
जळगाव : रोटरी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी.
–
‘रोटरी जळगाव’चा शिस्त अन् व्यवस्थापनाचा आदर्श
प्रांतपाल डॉ. राजेश पाटील : गणपती नगरमधील सभागृहात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : रोटरी संस्कृतीची योग्य जोपासना, शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन याबाबतीत संपूर्ण रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये रोटरी क्लब जळगाव हा आदर्श क्लब म्हणून नावलौकिक प्राप्त असल्याचे मत प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
गणपती नगरमधील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब जळगावला दिलेल्या गव्हर्नर अधिकृत भेटीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहप्रांतपाल ॲड. सागर चित्रे, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. ७७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या क्लबने महिला सदस्यांची संख्या वाढवावी आणि राजोत्सव या कॉन्फरन्समध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मानद सचिव स्वाती ढाके यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर केला. प्रांतपालांचा परिचय ॲड. सागर चित्रे यांनी करून दिला. डिस्ट्रिक्टच्या प्रथम महिला डॉ. सीमा पाटील यांचा हर्षदा भंगाळे यांनी स्वागत केले.
रोटरी क्लब जळगावच्या सदस्यांनी १५ थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण मुलांना दत्तक प्रकल्प अंतर्गत केलेल्या मदतीचा धनादेश प्रांतपाल डॉ. पाटील यांच्या हस्ते रेडक्रॉसचे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सुभाष सांखला, मंगला ठोंबरे यांना समन्वयक जितेंद्र ढाके यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
चौकट
प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू
रोटरी क्लब जळगाव आणि विद्यापीठाच्या विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पीस अँड हार्मनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रांतपालांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे, समन्वयक गिरीश कुलकर्णी व पंकज व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
––