द ग्रेट इंडियन बुक्स रेकॉर्डने घेतली रोटरी महावाचनाची नोंद

द ग्रेट इंडियन बुक्स रेकॉर्डने                घेतली रोटरी महावाचनाची नोंद
Published on: 
NSK26H32882 जळगाव : द ग्रेट इंडियन बुक्स रेकॉर्डचा सन्मान स्‍वीकारताना प्रेम कोगटा, अध्यक्ष हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके. ----------- ‘द ग्रेट इंडियन बुक्स रेकॉर्ड’ने घेतली रोटरी महावाचनाची नोंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : येथील विविध १८ शाळांत रोटरी क्लब जळगाव संचलित इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिनी ५,४२७ विद्यार्थी व व. वा. जिल्हा वाचनालयात १,०४७ वाचक अशा एकूण सहा हजार ४७४ जणांनी अभियानात वाचन करून सहभागी होत विक्रम घडविला. त्याची ‘द ग्रेट इंडियन बुक्स रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, प्रकल्प प्रमुख गिरीश कुलकर्णी, लिटरसी कमिटी चेअरमन विनया जोशी यांच्या नेतृत्वात प्रा. शुभदा कुलकर्णी, रितेश जैन, विश्वजीत बऱ्हाटे, पंकज जयस्वाल, सुधीर पाटील, डॉ. महेश पाटील यांच्यासह ६० सदस्यांच्या समितीने अभियानासाठी परिश्रम घेतले. रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य प्रेम कोगटा, अध्यक्ष हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांनी ‘द ग्रेट इंडियन बुक्स रेकॉर्ड’चा सन्मान स्वीकारला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते रोटरी क्लब जळगावचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com