पान-३ अँकर
फोटो ओळी:
छाया देसले- 16015
मधुकर पवार- 16016
आशा गायकवाड- 16017
संजय अहिरे- 16018
रवींद्र बाचकर- 16019
प्रा. संतोष जाधव- 16020
ज्योती निकम- 16021
उमा मोदी- 16022
-----
रोटरी क्लब ऑफ मालेगावतर्फे शिक्षक पुरस्कार
येसगाव बुद्रुक शाळेसहा दहा शिक्षकांचा सन्मान; सोमवारी वितरण
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. २ : रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनतर्फे यंदाचे नेशन बिल्डर ॲवॉर्ड जाहीर करण्यात आले. यंदाचा ‘कर्मयोगी शिक्षण संस्था पुरस्कार'' पुज्य साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी येसगाव बुद्रुक (ता. मालेगाव), तर दहा शिक्षकांना सोमवारी (ता. ५) सायंकाळी सहाला अग्रसेन भवन, वर्धमाननगर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संयोजक डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे व राजेंद्र दिघे यांनी दिली. पुरस्कारार्थींमध्ये प्राथमिक शिक्षक छाया देसले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळगाव), मधुकर पवार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंधारपाडे), आशा गायकवाड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नरडाणे), माध्यमिक शिक्षक संजय अहिरे (सरस्वती माध्यमिक विद्यालय, सायने बुद्रुक), कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक रवींद्र बाचकर (जनता कनिष्ठ विद्यालय, सौंदाणे), वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक : प्रा. हिरालाल नरवाडे, क्रीडाशिक्षक : प्रा. संतोष जाधव (मसगा महाविद्यालय, मालेगाव), ग्रंथपाल : डॉ. अरुण पठाडे, अंशकालीन निदेशक : ज्योती निकम (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंचगव्हाण), खासगी शाळा शिक्षक : उमा मोदी (मुख्याध्यापक, सांता किड्स स्कूल) यांची निवड झाली.
पुरस्कार निवडीसाठी ७१ शिक्षकांची शिफारस करण्यात आली होती. निवड समितीचे सदस्य म्हणून डॉ. सुरेखा दप्तरे, विजय डोखे, श्वेता पाटील, हृषीकेश शिंदे, प्रशांत पवार, डॉ. प्रेमल देवरे यांनी या निवडी अंतिम केल्या. शहर व परिसरातील मान्यवरांनी व शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनचे अध्यक्ष वैभव सोनवणे, सचिव प्रवीण निकम व शेखर सोनवणे यांनी केले आहे.