कष्टकऱ्यांना दिवाळीचा गोडवा

कष्टकऱ्यांना दिवाळीचा गोडवा
Published on: 
NSK26H34949 जळगाव : कष्‍टकऱ्यांना दिवाळी फराळ वाटप करताना रोटरीचे पदाधिकारी. – ‘रोटरी’मुळे २५५ कष्टकऱ्यांना दिवाळीचा गोडवा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : रोटरी क्लब जळगावचे ज्येष्ठ सदस्य कवंरलाल संघवी यांच्या सहकार्याने जळगाव रेल्वेसस्थानकावरील ७५ सफाई कामगार आणि हमाल बांधवांना तसेच पांजरपोळ गो-शाळेतील ४० सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच रोटरी क्लब जळगावच्या वतीने १०० दुष्काळग्रस्त व गरजू शेतकरी बांधवांची दिवाळी आनंददायी व्हावी, या भावनेतून जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथे दिवाळी फराळ वितरण करण्यात आले. या उपक्रमादरम्यान क्लबच्या डॉ. हर्षदा पाटील यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. रोटरी क्लब जळगावच्या धानोरा येथील इंटरॅक्ट क्लबमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकाशकंदील आणि दिवाळीचा फराळाचे चोपडा तालुक्यातील चंदणेतलाव येथील आदिवासी पाड्यावरील ४० कुटुंबाला वितरण करण्यात आले. यासाठी रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके, संदीप शर्मा, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन रितेश जैन, योगेश गांधी, पंकज व्यवहारे, नंदकिशोर जाखेटिया, विश्वजीत बऱ्हाटे, योगेश चौधरी, चंदन महाजन, कमलेश चांदवानी, तेजस पवार, वर्धमान संघवी यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.