Roti Business: विधवा महिलांसाठी रोटी बनली आधार! घरात कमावते नसल्याने जगण्याच्या लढाईत साहाय्य

Sahil Khalil Ahmed selling roti at Mushawarat Chowk in Malegaon.
Sahil Khalil Ahmed selling roti at Mushawarat Chowk in Malegaon.esakal

Roti Business : मालेगाव शहरात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. पूर्व भागात घटस्फोटीत, विधवा महिलांचा संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबांत कमविणारी व्यक्ती नसल्याने या महिलांना जगताना कसरत करावी लागते.

शहरात महिलांना पुरेसा रोजगार नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी काही महिला घरीच चपाती (रोटी) तयार करून येथील हॉटेल, अंडाभुर्जी व खाद्य पदार्थांच्या गाडीवर विक्री करतात.

यातून काही महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. जगण्यासाठी महिलांना रोटी आधार बनली आहे. येथे रोज ३० हजारहून अधिक चपात्यांची विक्री होते. (Roti become base for widows Help in fighting for survival as no earning at home malegaon nashik)

शहरात सुमारे अडीचशे महिला रोटी बनवून देण्याचे काम करतात. महिलांना येथे सहा व्यापारी रोटी बनविण्यासाठी गहू पीठ उपलब्ध करून देतात. या महिलांना ६० पैसे प्रती रोटी तयार करून देण्यासाठी मजुरी दिली जाते.

येथे दिवसभरात एक महिला घरातील काम करून चारशे चपाती तयार करतात. व्यापारी त्या चपाती हॉटेल्स, अंडाभुर्जी, मदरसे, पार्टी, खानावळ, यतीमखाना या ठिकाणी जाऊन तीन रुपये नगाने विक्री करतात.

यात गहू पीठ व महिलांना दिलेल्या रक्कमेचा खर्च काढून व्यापारी अल्पसा नफा कमवितात. शहरातील फार्मसीनगर, रमजानपुरा, पवारवाडी, आयेशानगर, देवीचा मळा, संगमेश्‍वर, अब्दूल्लाह नगर या भागातील महिला प्रामुख्याने रोटी तयार करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

येथे अमन चौक, टेन्शन चौक, सुलेमानी चौक, नूर हॉस्पिटल, सलामचाचा रोड, आयेशानगर या भागात रोटी विक्रीचे स्टॉल दररोज लावले जातात. रुग्णालयात असलेल्या रुग्ण व नातेवाईकांनाही ही रोटी हातभार लावते.

Sahil Khalil Ahmed selling roti at Mushawarat Chowk in Malegaon.
Inspirational News: सुई-दोरा बनला चांदवडच्या सुनंदाताईंच्या कुटुंबाचा आधार!

शहरात इस्लामपुरा, नयापुरा, नविन बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ व हॉटेल असल्याने चपातींची विक्री होते. येथे महिन्यात सुमारे नऊ लाख चपात्यांची विक्री होते असे सांगितले जाते.

एक किलो गहू पिठातून चाळीस चपात्या तयार होतात. शहरात सुरवातीला दीड रुपयाप्रमाणे चपातीची विक्री व्हायची. सध्या गव्हाचे दर वाढल्याने येथे तीन रुपये नगाने चपाती विक्री होते.

"शहरातील महिलांना तरासन, प्लास्टिक याशिवाय दुसरा रोजगार नाही. येथील काही महिला अशिक्षित असल्याने त्यांना शासनाचा योजनेचा लाभ मिळत नाही. गेल्या पाच वर्षापासून रोटी तयार करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने विधवा महिलांसाठी योजना राबवावी जेणे करून गरीब महिलांना लाभ होईल."- सादिका परवीन, रमजानपुरा, मालेगाव

"रोटी व्यवसायाने महिलांना घर बसल्यारोजगार मिळत आहे. शासनाने विधवा महिलांना पेन्शन द्यावी. रोटी व्यवसायाने निराधार महिलांना आधार दिला आहे."

- इजाज अहमद मोहम्मद मुस्तफा, रोटी व्यापारी, मालेगाव.

Sahil Khalil Ahmed selling roti at Mushawarat Chowk in Malegaon.
Inspirational Story: आयआयटीची तयारी, मग BA, आणि आता...; गोष्ट संकटाने न खचलेल्या एका विद्यार्थ्याची!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com