पान-२ दीड कॉलमसाठी
SNR26B23220
सिन्नर ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिन्नरच्या बाजारपेठेतून करण्यात आलेले संचलन.
------------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे
सिन्नरमध्ये संचलन उत्साहात
सिन्नर, ता.२२ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची शतकपूर्ती व विजयादशमीनिमित्त संघाच्या सिन्नर शाखेतर्फे गुरुवारी (ता.२२) पथसंचलन करण्यात आले. प्रमुख रस्त्यावरील ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून, नागरिकांनी संचालनाचे उत्साहात स्वागत केले.
२९० गणवेशधारी स्वयंसेवक व भारतीय मंगल देशातील १०० स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला. अग्रभागी असलेल्या सघोष पथकाच्या तालावर, दंडधारी स्वयंसेवकांनी प्रमुख रस्त्यावरून शिस्तबद्ध पथसंचलन केले. चांडक कन्या विद्यालयापासून संचलनाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन, वावी वेसमार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार व मानवंदना देऊन, संचलन, गणेशपेठ, शिंपी गल्ली, नेहरू चौक बसस्थानकाजवळ, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन, भैरवनाथ मंदिर, खासदार पूल नाशिक वेस, लाल चौक गंगावेस, महालक्ष्मी रस्त्याने परत चांडक कन्या विद्यालय येथे स्वयंसेवक आले. विद्यालयाच्या सभागृहात विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजन करण्यात आले. ग्रामीण जिल्ह्याचे व्यवस्था प्रमुख, गजानन देशपांडे यांनी संघ कार्याची महती सांगितली. उद्योजक नारायण क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तालुका कार्यवाह संदीप व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले.