राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सघोष पथसंचलनाचे पुष्पवृष्टीने स्वागत येवल्यात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सघोष पथसंचलनाचे पुष्पवृष्टीने स्वागत येवल्यात
Published on: 
YEO26B27255 येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मंगळवारी संचलनात सहभागी स्वयंसेवक. -------------------- ३६-४ संघाच्या सघोष पथसंचलनाचे पुष्पवृष्टीने स्वागत येवल्यात विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन सोहळा; कुलकर्णी यांचे व्याख्यान सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सव व संघाच्या स्थापनादिनानिमित्त सघोष, सदंड पथसंचलन आणि पारंपरिक शस्त्रपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर झालेल्या व्याख्यानात पश्चिम महाराष्ट्र प्रांत सप्रचारक केदार कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. टिळक मैदानावरील मुरलीधर मंदिर परिसरात सकाळी मुख्य कार्यक्रम झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध व सघोष पथसंचलन निघाले. यात आबालवृद्ध स्वयंसेवकही पूर्ण गणवेशात आणि हाती दंड घेऊन शिस्तबद्धतेने सहभागी झाले होते. संचलन मार्गावर नागरिकांनी घरांसमोर आकर्षक सडा-रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून शहरवासीयांनी जल्लोषात स्वागत केले. शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांनीही संचालनात सहभाग घेतला. संचलनानंतर पारंपरिक शस्त्रपूजन व मुख्य बौद्धिक कार्यक्रम झाला. प्रमुख वक्ते म्हणून केदार कुलकर्णी यांनी राष्ट्रभक्ती ही केवळ भावना नसून ते आपले कर्तव्य आहे; प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्या दैनंदिन आचरणातून आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन खरी देशसेवा सिद्ध केली पाहिजे असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून साई श्रीॲक्सिडेंटल ॲण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.विजय मोरे उपस्थित होते. तालुका संघचालक दिनेश मुंदडा व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. संघाचे शताब्दी वर्ष असून यामध्ये शाखांचा विस्तार व्हायला पाहिजे. संपूर्ण देशभरामध्ये कार्यकर्त्यांना, वर्गशिक्षित कार्यकर्त्यांना, अनुकूल स्वयंसेवकाना सोबत घेऊन शताब्दीमध्ये देशात शाखांचा विस्तार केला जाईल असे कुलकर्णी यांनी सांगितले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com