RTE Admission Scam: आरटीई प्रवेशात जिओ-टॅगिंग घोटाळा? पात्र असूनही वंचित चिमुकल्यांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे न्यायासाठी आर्त हाक

आरटीई प्रवेशात जिओ-टॅगिंग गैरप्रकारांचा आरोप; पात्र असूनही वंचित राहिलेल्या गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्यांकडे न्यायासाठी आर्त धाव
सटाण्यात आरटीई प्रवेशाचा 'जिओ-टॅगिंग' घोटाळा? चिमुकल्यांनी गाठले शिक्षणमंत्र्यांचे दालन; "पात्र असूनही अपात्र का?" विद्यार्थ्यांचा दादा भुसेंना सवाल

सटाण्यात आरटीई प्रवेशाचा 'जिओ-टॅगिंग' घोटाळा? चिमुकल्यांनी गाठले शिक्षणमंत्र्यांचे दालन; "पात्र असूनही अपात्र का?" विद्यार्थ्यांचा दादा भुसेंना सवाल

Sakal

Updated on

सटाणा : “आम्ही नियमांनुसार अर्ज भरले, पात्र ठरत असतांनाही आम्हाला अपात्र ठरवलं. आमचा गुन्हा काय?” असा प्रश्न करत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारत आम्हाला न्याय मिळवून द्या अशी आर्त मागणी केली. सटाणा शहर व तालुक्यात शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार खासगी शाळेतील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेमध्ये जिओ टॅगींगच्या माध्यमातून झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे पात्र असूनही अनेक गरजू बालकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतापाची लाट उसळल्यानंतर सटाणा दौर्‍यावर आलेल्या शिक्षणमंत्री श्री.भुसे यांची आज पालकांसह लहानग्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

छायाचित्र

सटाणा : शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आरटीई प्रवेशातील घोटाळ्या संदर्भात निवेदन देताना चिमुकले. समवेत माजी आमदार संजय चव्हाण, भारत काटके, स्वप्नील सोनवणे, तुषार सोनवणे, भूषण सोनवणे आदि. (छाया : रोशन खैरनार)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com