पंचवटी- वाहनांवर नंबरप्लेट ऐवजी भाऊ, दादा, मामा, काका, अण्णा अशा फॅन्सी पद्धतीने क्रमांक टाकणाऱ्या वाहनचालक यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जात आहे. विभागाने १ जुलै व १३ जुलैपर्यंत ८१४ वाहनांवर कारवाई करत पाच लाख ७३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. कारवाईत वाहनांच्या काचांना प्रतिबंधित असलेली काळी फिल्म असल्याबद्दल देखील कारवाई करण्यात आली आहे.