Fancy Vehicle Number plate
sakal
पंचवटी - वाहनधारकांमध्ये आपल्या आवडीचा किंवा आकर्षक वाहन क्रमांक खरेदी करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या ओघामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल पाच कोटी ३५ लाख १८ हजार ५०० रुपयांची घसघशीत वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या माध्यमातून एकूण १९ कोटी ५९ लाख ३९ हजार रुपये महसूल गोळा झाला असून, एकूण १४ हजार ६३८ वाहनधारकांनी ‘व्हीआयपी’ क्रमांकांना पसंती दिली आहे.