Nashik News | अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई : प्रदिप शिंदे

Minor Driver
Minor Driveresakal

नाशिक : अल्पवयीन मुलांकडून रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये, अन्यथा पालकांना शिक्षा व दंडात्मक करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (Action will be taken against parents if minors drive on roads Nashik News)

मोटार वाहन कायद्यांतर्गत १६ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला. गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविल्यास चालकास रूपये ५ हजार व वाहन मालकास ५ हजार असा एकूण १० हजार रूपये दंड व शिक्षेची तरतुद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Minor Driver
Nashik News : पांजरपोळ वाचविण्यासाठी नाशिककर सरसावले; पन्नासहून अधिक संघटनांचे आयुक्तांना निवेदन

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने याबाबत वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येवू नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन करीत आहेत. तरी पालकांनी याची गांर्भीयाने दखल घ्यावी, असे आवाहनही प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

Minor Driver
Ramzan Festival : रमजान पर्वात मालेगावला खवय्यांची चंगळ! पूर्व भागातील उपहारगृहांवर लागले पडदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com