नाशिक: गंभीर गुन्ह्यांसह परराज्यातून गावठी कट्टे आणून नाशिकमध्ये विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमडी (मॅफेड्रॉन) नामक अमली पदार्थाची विक्री करताना नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. साथीदारासह ताब्यात घेतलेल्या दोघांकडून सुमारे एक लाखांचे २९.९ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि कार असा सुमारे सव्वा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.