
नाशिक - ‘मी इन्कम टॅक्समधून बोलतोय. साहेबांच्या त्र्यंबकेश्वरच्या फार्महाऊसवर प्राप्तिकराचे पथक छापा घालणार आहे. या पथकाचा मी एक भाग असून, छापा रोखयचा असेल तर एक कोटी द्या,’ असा दूरध्वनी थेट माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आला. खंडणी मागणाऱ्या तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्याला शहर पोलिसांनी करंजाळीतून (ता. पेठ) सापळा रचून अटक केली आहे.