नाशिक - नाशिक ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्ह्यात सरप्राईजली ऑलआउट सर्च ऑपरेशन राबविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तर, कारागृहातून जामीनावर वा पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगारही ग्रामीण पोलिसांच्या रडारवर असून, बाहेर येऊन पुन्हा गुन्हे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत अधीक्षक पाटील यांनी दिले.