किरण कवडे : नाशिक- बदलती जीवनशैली, आहारातील अनियमितता आणि महिलांचे वाढते वजन यामुळे शहरी भागात सीझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढले असताना, ग्रामीण भागातील महिलांमध्ये अजूनही नैसर्गिक प्रसूतीचाच कल दिसून येतो. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ८५.२८ टक्के महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली असून, केवळ १४.७१ टक्के महिलांची सीझर प्रसूती झाली.