येवल्यात ग्रामीण भागातील रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा!

येवल्यात ग्रामीण भागातील रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा!
Published on: 
YEO26B27281 येवला : ग्रामीण भागात सुरळीत पुरवठा ठेवावा या मागणीचे निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी. -------------- ग्रामीण भागात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा भारनियमनामुळे विद्यार्थी, शेतकरी अडचणीत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा ----------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२२ : दुष्काळी परिस्थिती, बिबट्याचा वाढता वावर आणि शेतीतील संकटांचा सामना करणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागाला आता सायंकाळनंतरच्या वीज खंडित होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. वाड्या-वस्त्यांवरील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणकडे केली आहे. वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास शेतकरी, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. -------------- संघटनेने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दुसाने यांना निवेदन दिले आहे. ग्रामीण भागात सायंकाळी पाचनंतर भारनियमानाच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाड्या-वस्त्यांवर अंधार पसरत असल्याने चोरीच्या घटनांचीही धास्ती नागरिकांना सतावत आहे. कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यातील अनियमिततेचाही फटका बसत आहे. तालुक्यातील काही फिडरवर तीन फेज वीजपुरवठा सुरू असताना पूर्वसूचना न देता तो अचानक बंद केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ग्रामीण विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि पशुधनाची सुरक्षितता लक्षात घेऊन रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्वसूचनेनुसार नियमित करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयासमोर शेतकरी व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष विलास दरगुडे, दिगंबर दौंडे, नवनाथ आव्हाड, सुखदेव मोरे, अभिराज दौंडे, मारुती जाधव, राजेंद्र जाधव, रामदास जाधव, विठ्ठल गागरे, शांताराम सोनवणे, प्रभाकर खैरनार, विठ्ठल जाधव आदींच्या सह्या आहेत. ----------------
Marathi News Esakal
www.esakal.com