Nashik Crime : पोलिसपाटलांवरील प्राणघातक हल्ला उघड करण्यात ग्रामीण पोलिसांना यश

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी पोलिस ठाणे हद्दीतील निळवंडी शिवारात निळवंडी गावचे पोलिसपाटील अंबादास शंकर पाटील हे निळवंडी शिवारात १८ ऑगस्ट २०२२ ला कुरणात गायी चारत असताना अचानकपणे तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यात एकाच्या हातामध्ये लाकडी भरीव दांडा होता. त्या वेळी काहीएक न बोलता त्यापैकी दोघांनी पोलिसपाटील यांना पकडून धरले व एकाने सोबत आणलेल्या लाकडी दांड्याने त्यांचे दोन्ही पायावर जोर जोरात मारायला सुरवात केली.

त्यांना पकडून ठेवलेले दोन्ही व्यक्ती शिवीगाळ करत होते व लाकडी दांडा हाती असलेला व्यक्ती पोलिसपाटील यांना मारतच होता. पोलिसपाटील खाली कोसळल्यावर त्यांनी लाकडी दांडा तेथेच टाकून तेथून निघून गेले. संबंधित घटनेबाबत त्यांचा मुलगा संदीप अंबादास पाटील यांनी फिर्याद दिल्याने दिंडोरी पोलिस ठाणे गु.र.नं. २७४ /२०२२ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Rural police succeed in uncovering case of deadly attack on police Nashik Latest Crime News)

संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार पी. के. नवले करत होते. सदर गुन्ह्यात पोलिसपाटलांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. काकतकर यांचेकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रात त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याबाबत अभिप्राय असल्याने सदर गुन्ह्यात वाढीव कलम भा.द.वि. कलम ३२६ लावण्यात आले होते. त्यानंतर पुढील तपास चेतन लोखंडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. संबंधित गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा अपर पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अमोल गायकवाड उपविभागीय पोलिस अधिकारी कळवण विभाग, प्रमोद वाघ पोलिस निरीक्षक दिंडोरी यांचे मार्गदर्शनाखाली संबंधित गुन्ह्याचे तपासकामी तपास पथकास मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

तपास पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गोरक्षनाथ मधुकर शेखरे (वय ३१, रा. कादवानगर, दिंडोरी, ता. दिंडोरी), अविनाश राजेंद्र ढिकले (वय २२, रा. भगवा चौक, दिंडोरी, ता. दिंडोरी), सागर शंकर भवर (वय २०, रा. सरकारी दवाखाना मागे, दिंडोरी, ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, संदीप कॅग (रा. कृष्णगाव, ता. दिंडोरी), भावेश भवर (रा. कृष्णगाव, ता. दिंडोरी), समाधान उर्फ सागर धुळे (रा. वागळूद, ता. दिंडोरी) यांची नावे समोर आल्याने त्यांना वणी पोलिस ठाण्याचे मदतीने तपासकामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, सागर धुळे हा निळवंडी गावातील रोशन पाटील यांच्या शेतामध्ये मजुरीसाठी आलेला होता.

Nashik Crime News
Nashik Crime News : बँकेतून 17 लाखांची रोकड भामट्याने केली लंपास

त्या वेळी रोशन पाटील याने अंबादास पाटील, पोलिसपाटील निळवंडी यांच्यासोबत असणारे शेतजमीन वाटप व कौटुंबिक वादाला कंटाळून पोलिसपाटलाचा काटा काढण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी तुझ्याकडे कोणी गुंड प्रवृत्तीचे माणसे आहेत का? हे काम केले तर मी तुम्हाला ७० हजार रुपये देईन, असे सागर धुळेला बोलला होता. त्यानंतर सागर धुळे याने संबंधित गोष्ट त्याचे मित्रांना सांगून सर्वांनी कटकारस्थान रचून नियोजनपूर्वक अंबादास पाटील यांच्यावर ठार मारण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

फिर्यादी व साक्षीदार यांनी तसे जबाब दिल्याने सदर गुन्ह्यामध्ये भा.द.वि कलम ३०७, १२० (ब), १०८ प्रमाणे कलम वाढ करून संदीप कॅग, सागर धुळे, भावेश भवर, रोशन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांच्याकडे अधिक तपास चालू आहे. सदर कामाचे कौतुक म्हणून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.

Nashik Crime News
Nashik Crime News : उसनवारीच्या वादातून मद्याच्या नशेत खून; हत्येचा 12 तासांत उलगडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com