ग्रामीण चिमुकल्यांनी अनुभवला मल्टिप्लेक्सचा आनंद रोटरी वेस्टतर्फे बोरखेडा येथील ८० विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन

ग्रामीण चिमुकल्यांनी अनुभवला मल्टिप्लेक्सचा आनंद
रोटरी वेस्टतर्फे बोरखेडा येथील ८० विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन
Published on: 
ग्रामीण विद्यार्थ्यांनी अनुभवला विशेष चित्रपटाचा आनंद रोटरी वेस्टचा अभिनव उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१६ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बालपणात आनंदाचे क्षण फुलविण्यासह त्यांना नवा अनुभव देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाचोरा तालुक्यातील बोरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील ८० विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याचा हा पहिलाच अनुभव ठरला. भव्य पडदा, आरामदायी पुशबॅक खुर्च्या, आधुनिक ध्वनिव्यवस्था आणि चित्रपटगृहातील आकर्षक वातावरण यामुळे चिमुकले भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि डोळ्यांतील कुतूहलाने हा उपक्रम अविस्मरणीय ठरला, अशी भावना रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश राका यांनी व्यक्त केली. बालपणात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, या हेतूने हा उपक्रम आयोजित केल्याचे रोटरॅक्टचे अध्यक्ष ॲड. प्रा. प्रेम मराठे यांनी सांगितले. सेवा म्हणजे केवळ गरजांची पूर्तता नव्हे, तर इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणेही होय, हा रोटरीचा सेवाभाव या उपक्रमातून अधोरेखित झाला. याप्रसंगी रोटरी वेस्टचे मानद सचिव बिपिन काबरा, रोटरॅक्ट जळगाव वेस्टच्या मानद सचिव सेजल बाहेती यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com