Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजनानिमित्त वाहनांचा शिंगार करण्यासाठी गर्दी | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A flower seller and a rickshaw puller decorating a rickshaw on the occasion of Lakshmi Pujan

Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजनानिमित्त वाहनांचा शिंगार करण्यासाठी गर्दी

जुने नाशिक : लक्ष्मीपूजनानिमित्त आपल्या उदरनिर्वाहचे साधन असलेले लक्ष्मीरूपी वाहन सजविण्यासाठी फुल विक्रेत्यांच्या दुकानावर मोठी गर्दी झाली होती. वाहन आपल्यासाठी लक्ष्मीचे रूप आहे. तिची पूजा होणे आवश्यक आहे. यानिमित्त शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी त्यांच्या उदरनिर्वाहचे साधन असलेल्या चारचाकी आणि रिक्षा फुल विक्रेत्यांकडून सजवून घेतल्या. (Rush to decorate vehicles on occasion of Lakshmi Pujan 2022 Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Diwali Real Estate : रिअल इस्टेटमध्ये दिन... दिन... दिवाळी!

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध रूपातील आणि उदरनिर्वाचे साधन असलेल्या लक्ष्मीचे पूजन घरोघरी केले जाते. वर्षभर या माध्यमातून मिळणाऱ्या लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. यानिमित्ताने प्रत्येक जण आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करतो. व्यावसायिक त्यांच्या दुकानाची आणि दुकानाचा रोजनिशीची पूजा करतो. घरोघरी लक्ष्मीची प्रतिमा व केरसुणीची पूजा होते. शेतकरी शेत व शेती अवजारांची पूजा करतो.

रिक्षा, चारचाकी टेम्पो, ट्रकद्वारे बहुतांश जणांना उदरनिर्वाह चालतो, म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. यानिमित्ताने गुलाबाची फुले आणि फुलांची चादर, आकर्षक लाइटिंग लावून सजावट केली जाते. यानिमित्त जुने नाशिक येथील फुल विक्रेत्यांकडे विविध भागातील रिक्षा, टेम्पो चालकांनी गर्दी करून आपली वाहने सजवून घेतली. नंतर त्यांची पूजा केली. यामुळे फुल विक्रेत्यांनाही लक्ष्मी प्राप्त झाली.

हेही वाचा: Muhurat Trading : गुंतवणूकदारांकडून मुहूर्तावर शेअर खरेदी