नाशिक : पूरस्थिती पूर्वपदावर येताच घाटावर वाहने धुण्यासाठी गर्दी

Godavari Ghat latest marathi news
Godavari Ghat latest marathi newsesakal

नाशिक : वरूणराजाने उघडीप दिल्याने गोदावरीची (Godavari) पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक ठिकामी पाणी कुंडात परतले असले, तरी गाडगे महाराज पुलाच्या खालील बाजूस अद्यापही कुंडाबाहेर पाणी असल्याने हा परिसर दुचाकींसह चारचाकी वाहनांचे सर्व्हिस स्टेशन (Service station) बनले आहे.

विशेष म्हणजे गोदावरीत साधे कपडे धुतल्यास दंडात्मक कारवाईचा बगडा दाखविणारे सर्वच गायब असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहने धुणे बिनदिक्कल सुरूच होते. (Rushing to wash vehicles on godaghat as flood situation recedes nashik Latest Marathi news)

आठवडाभर सुरू असलेल्या संततधारेनंतर गोदावरीला यंदा प्रथमच मोठा पूर आला. पुराचे पाणी भांडी बाजार, कापड बाजार या भागत शिरल्याने नदीकाठच्या व्यावसायिकांसह नागरिकांना २०१९ च्या महापुराच्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या.

नुकसान नको, म्हणून अनेकांनी दुकानातील सामान आधीच काढून घेतले होते. मात्र, पाऊस थांबल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे व्यवासयिककांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, रामकुंड, गांधी तलाव, जुना भाजी बाजार भागात तरुणाईकडून सेल्फीला पसंती दिली जात आहे.

आता पूरस्थिती पूर्वपदावर येऊ लागली, तरी गाडगे महाराज पुलाच्या खालील बाजूस असलेल्या गौरी पटांगणावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने दुचाकींसह चारचाकी वाहने धुण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

यंत्रणेने गंगाघाटावर कपडे धुण्यासाहीही मज्जाव केला असताना, शंभराच्यावर वाहनधारकांनी एकाचवेळी गाड्या धुण्यासाठी गर्दी केली होती.

Godavari Ghat latest marathi news
सराफ वाड्याची भिंत कोसळून 2 जण जखमी

टपऱ्या जागेवरच

पूरस्थिती ओसरू लागली, तरी अद्याप भांडी बाजार, कापड बाजार, सरदार चौक भागात मोठ्या प्रमाणावर टपऱ्या ठेवण्यात आल्या असून, त्या वाहतुकीस अडसर ठरत आहेत. त्यामुळे या टपऱ्या योग्य जागी स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी दुकानमालकांसह नागरिकांनी केली आहे.

पुलावर पार्किंगला मज्जाव

वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून पोलिसांनी गाडगे महाराज पुलासह अन्य पुलांवरील चारचाकी वाहनांच्या पार्किंगला मज्जाव केला आहे.

तरीही गाडगे महाराज पुलाच्या एका बाजूने मोठ्या प्रमाणावर चारचाकी उभ्या राहिल्याने वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी गाड्या काढण्यासाठी संबंधित मालक चालकांना शोधत होते. मात्र, पोलिस याठिकाणी येण्यापूर्वीच चालक गायब झाल्याने त्यांच्यावर मालक शोधण्याची वेळ आली.

Godavari Ghat latest marathi news
Crime Update : दागिने, मोबाईलसह रोख रक्कम घरातून लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com