वाढदिवसानिमित्त कासारेत रक्तदान शिबिर

वाढदिवसानिमित्त कासारेत रक्तदान शिबिर
Published on: 
MSI26B09800 कासारे : रक्तदान शिबिरात सहभागी विविध संस्थांचे पदाधिकारी. --------------------- सचिन देसले यांच्या वाढदिवशी रक्तदान म्हसदी, ता. २७ : कासारे (ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अनंतराव देसले यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले. शिवतीर्थ बाजारपेठ परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात गावातील युवक, कार्यकर्ते व विविध संस्थांच्या पदाधिकारी अशा १०१ दात्यानी रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे व समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. धुळे येथील निर्णय जनसेवा ब्लड बँकेने रक्त संकलन केले. डाॅ. सिद्धार्थ पाटील, मनोज माळी, हेमंत माळी, सनम वळवी यांनी सहकार्य केले. गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अनंतराव देसले, साक्री कारखान्याचे माजी संचालक पी. एन. देसले, माजी सरपंच किशोर खैरनार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन जैन, किशोर खैरनार, माजी सरपंच सुभाष देसले, सतीश देसले, जयकुमार वाणी, प्रा. युवराज काकूस्ते, उपअभियंता बापू देसले, अविनाश खैरनार, प्रदीप वाघ, माहेश्‍वरी देसले, कल्याणी देसले, नितीन खैरनार, चंद्रकांत देसले, एल. आर. देसले, मिलिंद देसले, प्रमोद देसले, नामदेव देसले, दीपक देसले, सुनील देसले, बी. ए. सूर्यवंशी, संजय वाघ, सुरेश सोनवणे उपस्थित होते. शिबिरात सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com