Onion Crisis : सदाभाऊ, मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजणार केव्हा? रूई शेतकरी परिषदेतली गर्जना खरी होती की खोटी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot

Onion Crisis : सदाभाऊ, मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजणार केव्हा? रूई शेतकरी परिषदेतली गर्जना खरी होती की खोटी?

लासलगाव (जि. नाशिक) : कांदा दर घसरणीबाबत राज्यातील भाजप-शिंदे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याचे चित्र आहे.

रुई गावात जून २२ मध्ये सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद घेऊन त्यावेळेस सरकारने कांदा अनुदान न दिल्यास कांदा ज्यूस पाजू असा इशारा दिला होता. सध्याची परिस्थिती पाहता खोत यांना याचा विसर पडल्याचे दिसत आहे.

सदाभाऊ खोत आता गप्प का असा प्रश्‍न कांदा उत्पादकांनी उपस्थित केला आहे. (Sadabhau khor statment at cotton farmers council after onion price fall nashik news)

"जागर शेतकऱ्यांचा आक्रोश कांदा उत्पादकांचा" म्हणत ५ जून २०२२ ला संपूर्ण राज्याचे लक्ष लागले ते निफाड तालुक्यातील रुई गावात होणाऱ्या कांदा परिषदकडे. तब्बल ३९ वर्षानंतर झालेल्या या परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ रुपये किलो अनुदान मिळावे याकरिता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत कांदा दराबाबत एक आठवड्याची मुदत देत आहोत. त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर लासलगाव येथे कांद्याला हमीभाव व अनुदानासाठी प्रहार जनशक्तीने केलेले आंदोलन तसेच येवला येथील कांदा उत्पादन आणि व्यापार यासाठी झालेले आंदोलन. या आंदोलनाची चर्चा राज्यात जोरात झाली. मात्र अद्यापपर्यंत कांद्याला अनुदान मिळावे म्हणून असा कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. आता तर ५० पैसे किलो कांद्याला दर मिळत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. राज्य सरकारने कांद्याला अनुदान न दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करून मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजू असा इशारा देणारे सदाभाऊ मंत्र्यांना केंव्हा ज्यूस पाजनार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

१६-१ चौकट

आता मुके, बहिरे कोण हो, पडळकर

याच कांदा परिषदेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी महाविचे सरकार बहिरे, आंधळे अन मुके असल्याचे संबोधले होते. प्रवीण दरेकर यांनी या कांदा परिषदेत बोलताना ४० वर्ष उलटूनही कांद्याचे प्रश्न कायम आहेत, याची खंत आहे. सरकार बदलले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी तेव्हा रडणारे, गळा काढणारे आत्ताचे सत्ताधारी आता मूग गिळून गप्प का असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. व्यासपीठावरून मोठमोठी लांबलचक भाषणे करताना आपल्याला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, बळीराजा अशा अनेक प्रकारच्या उपमा देवून त्यांची भलावण करतात; परंतू प्रत्यक्षात मदत करण्याची वेळ आल्यावर हजार कारणे सांगितली जातात.

--------------

Remarks :