Sadabhau Khot : आजचा शत्रू उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू...: सदाभाऊ खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sadabhau khot

Sadabhau Khot : आजचा शत्रू उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू...: सदाभाऊ खोत

लासलगाव (जि. नाशिक) : रयत क्रांती संस्थेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रुई (ता. निफाड) येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या विधानावरून आजचा शत्रू हा उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू होऊ शकतो, असे सांगत भविष्यात भाजप आणि उद्धव ठाकरे गटाची युती होऊ शकते का, यावर थेट बोलण्याचे टाळले. (Sadabhau Khot statement about future BJP Uddhav Thackeray group alliance nashik news)

भाजपचे माजी खासदार काकडे यांनी मनसे व भाजप युतीला विरोध करत भविष्यात भाजप, उद्धव ठाकरे गट व शिंदे गट युती होऊ शकते, असे मोठे विधान केले. यावर श्री. खोत म्हणाले, की कोणाला बरोबर घ्यायचे किंवा नाही हे भाजप ठरवेल. भाजपकडे तितके नेतृत्व सक्षम आहे. भाजपकडे अनेक घटक पक्ष आहेत.

राजकारणामध्ये काहीही होऊ शकते, आजचा शत्रू हा उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू होऊ शकतो; पण भाजप हा वाढत जाणारा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंमुळे सत्तेच्या घडामोडी घडल्या. त्यांच्याबरोबर भाजप जाईल, असे मला वाटत नसल्याचे बोलत उघड उघड बोलण्यास टाळले.