जुने नाशिक: आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा प्रत्येकाने मान राखलाच पाहिजे. त्या पदाची शान राहील असे वागले पाहिजे, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार एकनाथ खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याविषयी विरोधक सत्ताधारी यंत्रणेस हाताशी धरून यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करीत आहेत. यावर विरोधक काहीही बोलतील, ते जोकर आहेत, अशी टीकाही श्री. खोत यांनी केली.