ॲंकर
NSK26H33836
जळगाव : कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तज्ज्ञ प्रशिक्षक. सोबत अपर अधीक्षक संदीप गावित.
---
जिल्ह्यात ''सडक सुरक्षा मित्र'' उपक्रम
पोलिस अधिकारी, विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा अन् प्रथमोपचारांचे धडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि आपत्कालीन प्रसंगी अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे, या उद्देशाने जिल्हा पोलिस दल व ''सेव्ह लाइफ फाउंडेशन''च्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ''सडक सुरक्षा मित्र'' प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.
जिल्ह्यातील वाढते प्राणांतिक अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच अपघातस्थळावर तत्काळ आहे त्याचीच मदत उलब्ध व्हावी, या संकल्पनेतून जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली २७ ते २८ ऑक्टोबरला या दोन दिवसात या उपक्रमांतर्गत ''झीरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट''बाबत उपस्थितांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमधील ६० पोलिस अधिकारी-अंमलदार तसेच एम. जे. कॉलेज, रायसोनी कॉलेज, नूतन मराठा महाविद्यालय आणि त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट (पॉलीमार) जळगाव येथील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
चौकट
..तर अपघातग्रस्तांला जीवदान
कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञांनी रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, अपघातावेळची खबरदारी तसेच जखमींना तातडीने प्राथमिक आघातोपचार देण्याबाबत मार्गदर्शन केले. अपघातानंतरचा पहिला प्रतिसाद (गोल्डन अवर) वेळेत व योग्य पद्धतीने मिळाल्यास अनेक अमूल्य जीव वाचू शकतात, हे यातून अधोरेखित करण्यात आले. यावेळी सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या प्राची व्यास, प्रियांकित पनवर, विवेक भुसे, शिवम सिंह तसेच आयसीआयसीआय लोम्बार्डचे नजीम खान, कपिल सिंग यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.