नंदुरबारात गवळी समाजातर्फे ‘सगर’ उत्सव जल्लोषात

नंदुरबारात गवळी समाजातर्फे ‘सगर’ उत्सव जल्लोषात
Published on: 
(टुडे पान एक सेकंड लिडसाठी) --- NSK26H34871 नंदुरबार : येथील सोनी विहीरजवळ वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे आयोजित सगर उत्सवास उपस्थित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी. शेजारी नगरसेवक गौरव चौधरी, महादू हिरणवाळे, लक्ष्मण यादबोले आणि समाजबांधव, वीरशैव लिंगायत गवळी समाज पंच मंडळी आणि समाजबांधव. --- NSK26H34870 वावद : येथे आयोजित रेड्यांच्या झुंजीत विजय ठरलेल्या रेड्यासमवेत राजेंद्र गवळी, विजय गवळी आणि समाजबांधव. --- गवळी समाजातर्फे ‘सगर’ उत्सव जल्लोषात वावद येथे रेड्यांची टक्कर, कुस्त्या; बादल रेडा ठरला आकर्षण सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १२ : नंदगवळी राजा यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला ‘सगर पूजन’ उत्सव नंदुरबारात जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवात होणाऱ्या रेड्यांच्या झुंजी नंदुरबारात झाल्या नाहीत; मात्र तालुक्यातील वावद येथे रेड्यांची टक्कर आणि कुस्त्या भरविण्यात आल्या. पाडव्यानिमित्त आयोजित या उत्सवाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाज पंचमंडळी आणि समाजबांधवांनी या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदविला. नंदुरबार येथील यादबोले परिवारातील ‘बादल’ रेडा आकर्षण ठरला. याशिवाय देवर्षी, घुगरे, नागापुरे आणि हुच्चे परिवार रेडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. गवळीवाडा, सिदाजी आप्पा देवर्षी नगर, बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर, शिवाजी रोड, सुभाष चौक, नाट्यमंदिर परिसरातून रेड्यांची ढोल-ताशे, संबळ आणि डीजेच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. समाजातील इतर पशुमालकांनी देखील आपले रेडे सजवून मिरवणुकीद्वारे सोनी विहीर येथे पूजनासाठी आणले होते. याप्रसंगी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि नगरसेवक गौरव चौधरी, दीपक दिघे यांनी उपस्थित राहून सगर उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक वाद्य आणि डीजेच्या तालावर फटाक्यांची आतषबाजी करीत सगर उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील वावद येथे रेड्यांची झुंज झाली. विजय लक्ष्मण गवळी यांच्या रेड्याला विजयी ठरवून आयोजन समितीतर्फे चांदीची ढाल बक्षीस देण्यात आली. तसेच याठिकाणी कुस्त्यादेखील लक्षवेधी ठरल्या. विशाल लगडे यांनी कुस्त्यांमध्ये चमकदार कामगिरी दाखविली. वावदसह पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या मल्लांनी सहभाग नोंदवून रोख बक्षिसे जिंकली. महाभारत काळात श्रीकृष्ण भगवान यांनी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजबांधवांच्या पशुधनाचे रक्षण केले तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. शेकडो वर्षापासून नंदुरबार शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे सगर उत्सवाची परंपरा टिकून आहे, असे महादू हिरणवाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.