esakal | अथांग सागराशी मीही करणार दोन हात… चहा टपरी चालवणाऱ्या साहिलची जिद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Sahil Sayyad

अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

sakal_logo
By
मुकुंद भडांगे

कोकणगाव (जि. नाशिक) : नौकानयनातील रोईंग या क्रीडाप्रकारात नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दत्तू भोकनळ यापासून प्रेरणा घेत येथील साहिल युनुस सैय्यद या नवख्या क्रीडापटूने त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अथांग सागराला गवसणी घालत त्याच्याशी दोन हात करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी तो अपार मेहनत आणि कष्ट करीत असून त्याच्या मेहनतीकडे पाहिल्यास तो एकदिवस नक्कीच कोकणगावचे नाव सातासमुद्रापार नेणार यात शंका नाही… (sahil sayyad working hard to represent the india in rowing in kokangaon)

शिक्षण व घरासाठी हातभार..

कुटुंबाची परिस्थितीत जेमतेम, पण जिद्दीमुळे तो रात्रंदिवस मेहनत करू लागला. घरातील सर्वात लहान असला तरी साहील घरासाठी सर्वात मोठी जबाबदारी पार पाडतोय. स्वप्न साकारण्यासाठी तो निरंतर धडपड करत असतो. शिक्षण व घरासाठी हातभार म्हणून तो चहाची टपरीही चालवतो व उदरनिर्वाह करतो. रोज सकाळी साहिल कोकणगाव कादवा नदीवर बोटिंगसाठी येत असतो. सध्या साहिल बी.ए. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. साहिल उत्तम प्रकारे नौकानयन करतो. अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने कॅनोईंग स्पर्धेत व जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या अखिल भारतीय आंंतर विद्यापीठ स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावलं आहे.

देशसेवेसाठी पोलिस किंवा सैनिक व आशियाई स्पर्धेत जाण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या या यशामागे त्याला महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, आमदार दिलीप बनकर, क्रीडा प्रमुख पाटील, सुलतान देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल विकास वाळुंज तसेच त्याच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे.


(sahil sayyad working hard to represent the india in rowing in kokangaon)

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली

loading image