Shirdi Palkhi
Shirdi Palkhiesakal

Shirdi Palkhi : सिन्नर-शिर्डी मार्गावर साईभक्तांची मांदियाळी; ठिकठिकाणी भव्य स्वागत

Published on

सिन्नर : रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबई उपनगरांतून हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत. ‘ॐ साई राम, बोलो जय साईराम’च्या जयघोषात सिन्नर-शिर्डी रस्ता साईभक्तांनी अक्षरश: फुलला आहे.

Shirdi Palkhi
Sai Baba Palkhi : साईपालख्यांनी दुमदुमला महामार्ग! महिलांचा सहभाग लक्षवेधी

हजारो साईभक्तांचे तालुक्यातील अनेक भागात जोरदार स्वागत करून त्यांची व्यवस्था ठेवली जात होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेकडो साई पालख्या रामनवमीच्या उत्सवासाठी शिर्डीला जातात. या साई पालख्यांचे येथे शुक्रवारपासून आगमन होण्यास सुरुरवात झाली. हजारो साई भक्तांमुळे सिन्नर-शिर्डी मार्ग फुलला होता.

साईभक्तांचे उन्हापासून संरक्षण होऊन त्यांना सावली व आराम मिळावा यासाठी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर ठिकठिकाणी शामियाने उभारण्यात आले. ठिकठिकाणी अल्पोपाहार, जेवण व मुक्कामाचीही व्यवस्था करण्यात आली. पहाटेपासूनच सिन्नर-शिर्डी रस्ता ‘ओम साई राम’च्या निनादात दुमदुमून गेला होता.

Shirdi Palkhi
Shirdi : भाविकाकडून साईबाबा मंदिराला 33 लाखांचा हिरेजडित सोन्याचा मुकुट दान

साईभक्तांच्या गर्दीमुळे सिन्नर तालुक्यातील अनेक भागात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिन्नर शहरातही येथील साई पालखी सेवा संस्थानतर्फे साईभक्तांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी (ता. ३०) रामनवमी असल्याने मुंबईच्या विविध उपनगरांतील हजारो साईभक्त पदयात्रेद्वारे शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत.

या पदयात्रा, पालख्यांसोबत आकर्षक साईरथ दिसून येत आहेत. तसेच, साईबाबांच्या महाकाय मूर्ती, साईरथांना आकर्षक रोषणाई लक्षवेधी ठरत आहे. त्यातच पालख्यांमध्ये साईंरथात आकर्षक देखावे सादर करण्यात आल्याने विविध रथ पाहण्यासाठी गावागावात आकर्षण ठरत आहे.

Shirdi Palkhi
Nashik News : पदवीधर डी. एड शिक्षकांच्या सेवाजेष्ठता लढ्याला यश; प्रवर्ग 'क' मध्ये समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com