Nashik : सायखेडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा बोटिंग करतांना बुडून दुर्दैवी मृत्यू

Ravindra Bhoir
Ravindra Bhoiresakal

चांदोरी (जि. नाशिक) : सायखेडा शिवारातील गोदावरी नदीपात्रात सायखेडा महाविद्यालयाचा जलतरण बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक ७ सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी सव्वा आठ वाजेपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचे शोध कार्य सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने कळवले आहे. रवींद्र बाळकृष्ण भोईर वय वर्ष अंदाजे वीस हा सायखेडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो चाटोरी तालुका निफाड येथील असल्याचे समजते. (Saikheda college student drowned while Latest Nashik News)

Ravindra Bhoir
Fake Currency Crime : सिडकोमध्ये उपेंद्रनगर परिसरात 500च्या बनावट नोटा चलनात

घटनास्थळी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक शोध कार्य करत असून यामध्येसायखेडा पोलीस, तसेच चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख,बाळू आंबेकर,अजय चारोस्कर,सोमनाथ कोटमे,मधुकर

आवारे, संतोष लगड यांचा समावेश आहे.सदरचा विद्यार्थी हा गोदावरी नदी पात्रात बोटिंग करणारा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे,सोमवार दि ७ नोव्हेंबर,सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा विद्यार्थी बोटिंगचा सराव करत होता, ज्या ठिकाणी घटना घडली त्या परिसरात सुमारे ४० हुन अधिक फूट खोल गोदावरी नदीचे पाणी पातळी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सांगितले.सकाळी सव्वा आठ वाजेपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचा गोदावरी नदीपात्रात शोध घेतला जात असून संध्याकाळ पर्यंत या शोध कार्याला यश आले नव्हते, दरम्यान घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी,आपत्ती व्यवस्थापन पथक,परिसरातील ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित आहेत. या घटनेमुळे सायखेडा व चाटोरी परिसरात शोककळा पसरली आहे.

Ravindra Bhoir
Chhagan Bhujbal : माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com