संत बलजीत सिंहजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिरसोलीत सत्संग

संत बलजीत सिंहजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिरसोलीत सत्संग
Published on: 
संत बलजीतसिंह महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्संग शिरसोलीत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२९ : संत बलजीत सिंहजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विश्व मानव रूहानी केंद्र, नवानगर शाखेतर्फे रविवारी (ता. १) शिरसोली येथील लाइट हाऊस सेंटरमध्ये भव्य सत्संग सोहळ्यासह विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी नऊ ते दहा या वेळेत भजन गायनाने होईल. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत ध्यान-भजन, तर अकरा ते दुपारी बारापर्यंत प्रोजेक्टरच्या माध्यमातून संत बलजीत सिंहजी महाराज यांचे सत्संग व प्रवचन दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी लंगर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. चौकट आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com