नाशिक- जगाला एकात्मतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या स्मारकाला तब्बल १८ वर्षांनी मुहूर्त लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गाडगे महाराज धर्मशाळेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या स्मारकात पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार असून पुतळ्यासाठी चबुतरा तयार करण्याच्या कामाला स्थायी समितीकडून मान्यता मिळाली आहे.