
SAKAL Drawing Competition 2023 : सकाळ चित्रकला स्पर्धा पोहचली अतिदुर्गम शाळेत!
पळसन (जि. नाशिक) : सकाळ माध्यम समूहातर्फे घेण्यात आलेली राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा सुरागणा तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागातील शाळांमध्ये पोहचवली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी पाच ते सात किलोमीटर आनंदाने पायपीट करून सहभाग घेतला.
यामध्ये सुरगाणा तालुक्याती बाऱ्हे, ठाणगाव येथील केंद्रामध्ये भवाडा, आंबेपाडा (बे), आंबेपाडा (ह), मनखेड, गोपाळपूर, बा-हे, ठाणगाव, अळीवदांड आदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. (SAKAL Drawing Competition 2023 reached remote school at surgana boundry nashik news)
कळवणचे प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय आश्रमशाळा पळसन, सालभोये, करंजूल (सु), करंजूल(क), आबूपाडा(बे) भोरमाळ, माणी, बोरपाडा, खुटविहीर, बुबळी, सराड, डोल्हारे, अनुदानित आश्रमशाळा हतगड, शिंदे दिगर, मोहपाडा, श्रीभुवन, अलंगुण, उंबरठाण, गुही, कुकूडणे, चिंचला, मनखेड, आंबेपाडा (ह), भेगूसावरपाडा खिर्डी, सुरगाणा या शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी भरसट, विस्तार अधिकारी बाबूराव महाले, ठाणगाव येथील शिक्षक पांडुरंग पवार, योगिराज महाले, पुना चौधरी, सुनील महाले, भोंडवे, गवळी, पगार, श्रीभुवन येथील एकनाथ गावित, सनील पाटील, अविनाश अहिरे,
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
हेही वाचा: Nashik News : सारुळच्या खाणपट्टाप्रकरणी शेतकऱ्यांचे मुंबईत उपोषण! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
उंबरठाण लक्ष्मण बागूल, सतीश इंगळे, राजेंद्र गावित, सुमित्रा जाधव,अलंगुण येथील गजानन पाल, हेमंत बागूल, सुरेश पवार, भगवान पाटील, आर. आर. ठाकरे, पी. बी. बागूल, पी. डी. देवरे, सुरगाणा येथील शिक्षक यशवंत देशमुख, नाथ देशमुख, सखाराम पवार, माधव वाघमारे, रतन चौधरी यांनी परिश्रम घेतले.
शासकीय आश्रमशाळा शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश चौधरी, सराडचे मुख्याध्यापक बी. के. कावळे, अलंगुणचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, तुकाराम गावित, उंबरठाण मुख्याध्यापक सी. के. झिरवाळ यांनी सहकार्य केले.
हेही वाचा: Nashik News : उपशिक्षणाधिकारी सेवाप्रवेश नियमात सुधारणा; शिक्षण विस्तार अधिकारींना पदोन्नतीची संधी