धुळ्यात आज
‘सकाळ अभियंता दिन’ सोहळा
---
जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते प्रतिभावंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे धुळे शहरात ‘सकाळ अभियंता दिन’ सोहळा होणार आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंत अभियंत्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कृतज्ञता सोहळा होईल. हा सोहळा गुरुवारी (ता. १५) दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगलगत दाते रिजन्सी येथे होणार आहे.
येथील जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे प्रमुख पाहुणे राहतील. त्यांच्या हस्ते खानदेशातील प्रतिभावंत अभियंत्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान होणार आहे. समाजविकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अभियंत्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मारुती दातीर उपस्थित राहतील. या सोहळ्याला निमंत्रित अभियंत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.
चौकट
कार्यक्रम एका नजरेत
कार्यक्रम : सकाळ अभियंता दिन सोहळा
वार व तारीख : गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६
वेळ : दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत
स्थळ : दाते रिजन्सी, मालेगाव रोड, रेल्वे क्रॉसिंगजवळ, धुळे