Sakal Exclusive : 11 झोपडपट्ट्या सर्वाधिक धोकादायक

Slum area latest marathi news
Slum area latest marathi newsesakal

नाशिक : शहरात आग लागल्यास अग्निशमन दलाचे बंब जागेवर पोहोचू शकत नाहीत, अशा ११ धोकादायक झोपडपट्ट्या आहेत. तर जुने नाशिकमधील बुधवार पेठ, खैरे गल्ली, बागवानपुरासह २० ठिकाणे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Sakal Exclusive 11 most dangerous slums in City impossible to reach firefighters in emergency nashik latest Marathi News)

शहरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. घडलेल्या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. चार महत्त्वपूर्ण आग लागण्याच्या घटनांमध्ये दोन झोपडपट्टी, तर दोन आगी दुकान व मॉलला लागल्या. रविवार कारंजावरील संगणक गुदाम व गंजमाळच्या मास्टर मॉलला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटबरोबरच आता इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात गावठाण व झोपडपट्टी भागात २० ठिकाणी हायड्रंट पॉइंट निश्चित करताना स्मार्टसिटी कंपनीला प्रस्तावही सादर करण्यात आला.

शहराचा विस्तार वाढत असताना, आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पायाभूत सुविधा भक्कम करताना धोकादायक जागांचे सर्वेक्षण करण्यात आले.

ही आहेत धोकादायक ठिकाणे

आग लागल्यास अग्निशमन दलाचे बंब पोहोचू शकणार नाहीत, अशा स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात जुने नाशिकमधील नागसेननगर, संत कबीरनगर, गंजमाळ येथील येथील भीमनगर व पंचशीलनगर, टाकळीगाव, अशोक स्तंभावरील मल्हार खान, उपनगर कॅनॉल रोडवरील आम्रपाली झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी (गांधीनगर), राहुलनगर, पंचशीलनगर, पश्चिम विभागातील जोशीवाडा, सातपूर विभागातील संतोषीमाता झोपडपट्टी, पंचवटी विभागातील कॅनल रोड, नाशिक गावठाणातील बुधवार पेठ, बागवानपुरा, भद्रकाली या भागांचा समावेश आहे. या भागात एक ते दोन मीटरचे रस्ते आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब पोहोचू शकत नाही.

"शहरात काही भाग धोकादायक स्थितीत आहेत. आग लागल्यास या भागात अग्निशमन दलाचे बंब पोहोचू शकत नाहीत." -संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com