SAKAL Exclusive: ‘मुक्‍त’मध्ये 4 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेशप्रक्रियेला राज्‍यस्‍तरावर प्रतिसाद
YCMOU
YCMOUesakal

SAKAL Exclusive : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया आटोपली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्‍यभरातील चार लाख ६० हजार ९६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (SAKAL Exclusive Admission of 4 lakh 60 thousand students in YCMOU nashik)

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या मुक्‍त विद्यापीठामार्फत दूरस्‍थ शिक्षण पद्धतीतून पदविका, पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्‍ध करून दिलेले आहेत. समाजातील प्रत्‍येक घटकाला शिक्षणाच्‍या प्रवाहात येण्याची संधी उपलब्‍ध करून देताना शैक्षणिक अर्हतेनुसार अभ्यासक्रमास प्रवेशाचे पर्याय विद्यापीठाने दिले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेशप्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, याकरिता विद्यापीठातर्फे ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला वारंवार मुदतवाढ देण्यात येत होती.

अखेर वाढीव मुदत २० ऑक्‍टोबरला संपली आहे. शिक्षणशास्‍त्र शाखेतील अभ्यासक्रम वगळता अन्‍य बहुतांश अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. आत्तापर्यंत चार लाख ६० हजार ९६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

YCMOU
Nashik ZP School : जिल्हा परिषद शाळेला कोणी शिक्षक देता का... विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

तुलनेत प्रवेशात घट

यापूर्वी गेल्‍या काही शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यापीठात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सव्वासहा लाखांपर्यंत राहिलेली आहे. परंतु कोरोना महामारीनंतरच्‍या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्‍या संख्येत सातत्‍याने घट होते आहे.

यंदा पाच लाखांचा टप्पा ओलांडण्याचा निर्धार विद्यापीठ प्रशासनातर्फे व्‍यक्‍त करण्यात आला होता. परंतु गत शैक्षणिक वर्षांच्‍या तुलनेत प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमीच असल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होते.

या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

विद्यापीठातर्फे पदविका, पदवी व पदव्‍युत्तर पदवीस्‍तरावर विविध विद्याशाखांचे अभ्यासक्रम उपलब्‍ध आहेत. यापैकी काही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

यात प्रामुख्याने कृषी अभ्यासक्रमासह बीए, बीकॉम, एमबीए, तसेच भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित या विषयांतील पदव्‍युत्तर पदवी (एम.एसस्सी.) व पदवी (बी.एसस्सी.) अभ्यासक्रम इनव्‍हॉयरमेंटल सायन्‍स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

YCMOU
Nashik ZP News: सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा 37 टक्के निकाल; 158 पैकी केवळ 58 कर्मचारी उत्तीर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com