SAKAL Exclusive: AICTE ने रोखली ‘एम.फार्म’ ची शिष्यवृत्ती; विद्यार्थ्यांवर वंचित राहण्याची वेळ

students frustrated
students frustratedesakal

SAKAL Exclusive : औषधनिर्माणशास्‍त्र आणि वास्‍तुशास्‍त्र शिक्षणक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्‍था (एआयसीटीई) कडून मान्‍यता दिली जाणार नसल्‍याने, अभ्यासक्रमांना दिली जाणारी शिष्यवृत्ती रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना पदव्‍युत्तर पदवी शिक्षण, संशोधनापासून वंचित राहण्याची वेळ ओढवणार आहे.

फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाकडे संलग्‍नतेचा अधिकार आलेला असल्‍याने कौन्‍सिलने शिष्यवृत्ती योजना जाहीर करत विद्यार्थ्यांना न्‍याय देण्याची मागणी होत आहे. (SAKAL Exclusive AICTE suspends MPharm scholarship Time spent on students deprived of education nashik news)

esakal

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी निवेदन जारी करतांना शिष्यवृत्ती खंडित करत असल्‍याचे कळविले आहे. सूचनापत्रकात म्‍हटले आहे, की शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ‘एआयसीटीई’ कडून फार्मसी, आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमांना मान्‍यता दिली जाणार नाही.

त्‍यामुळे ‘एआयसीटीई’ ने निश्‍चित केले आहे की, जिपॅट, आर्किटेक्‍चरकरिताच्‍या शिष्यवृत्तीचे अनुदान व अन्‍य योजना या देखील थांबविण्यात येत आहेत. सध्या प्रवेशीत असलेल्‍या व शिष्यवृत्ती मिळत असलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांचा शिक्षणक्रमाचा निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

जिपॅट, आर्किटेक्‍चरकरिता शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शिष्यवृत्तीस मान्‍यता किंवा प्रदान करण्याची प्रक्रिया थांबविण्यात येते आहे. या निर्णयामुळे मात्र विद्यार्थी, पालकांमध्ये रोष आहे.

अनेक हुशार व गरजू विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्‍या बळावर पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेऊ शकत होते. परंतु आता शिष्यवृत्तीच बंद झाली तर होतकरू विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे.

students frustrated
Education News : कमी टक्क्यांमुळे बिघडणार प्रवेशाचे गणित ?

साडेदहा हजार विद्यार्थ्यांना मिळतेय शिष्यवृत्ती

आत्तापर्यंत ‘एआयसीटीई’ यांच्‍यामार्फत जिपॅट परीक्षेतून पात्रताधारक विद्यार्थ्यांना एम. फार्मसीच्‍या शिक्षणाकरिता दर महिन्‍याला १२ हजार ४०० रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती अदा करण्यात येत होती.

नुकताच मार्च महिन्‍याची शिष्यवृत्तीची रक्‍कम विद्यार्थ्यांच्‍या बँक खात्‍यात जमा करण्यात आलेली आहे. ‘एआयसीटीई’ च्‍या आकडेवारीनुसार देशभरातील १० हजार ६७९ विद्यार्थ्यांच्‍या खात्‍यात ही शिष्यवृत्ती जमा केलेली आहे. तर १२० विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणांनी शिष्यवृत्ती वर्ग होऊ शकलेली नाही.

‘पीसीआय’ ने जाहीर करावी शिष्यवृत्ती

औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांच्‍या मान्‍यतेचे अधिकार फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाकडे आलेले आहे.

अशात आता एआयसीटीईने शिष्यवृत्ती थांबविली असतांना तातडीने पीसीआयने शिष्यवृत्ती सुरू ठेवण्यासंदर्भात आवश्‍यक ती कार्यवाही करता होतकरू विद्यार्थ्यांसाठी अखंडितपणे शिक्षणाची दारे खुली ठेवण्याची मागणी होत आहे.

आता फार्मसी कौन्‍सिलच्‍या भूमिकेकडे देशभरातील विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

students frustrated
Education News : आदिवासी विद्यार्थिनीला शिक्षणासाठी साहाय्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओडिशा सरकार सरसावले

तर परीक्षा दिलेल्‍यांचे काय?

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शिष्यवृत्ती रोखण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. दुसरीकडे नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे नुकताच २२ मेस देशभरातील केंद्रांवर जिपॅट परीक्षा घेण्यात आलेली असून, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अशात जर शिष्यवृत्तीच थांबविली असेल, तर परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घेतलेल्‍या मेहनतीचे काय? असा प्रश्‍नदेखील उपस्‍थित झाला आहे.

जिपॅट परीक्षेतून पात्रताधारक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे

"अनेक होतकरू विद्यार्थी संशोधनकार्य हाती घ्यायचे. परंतु शिष्यवृत्तीच बंद झाली तर आर्थिक परिस्‍थितीअभावी हुशार विद्यार्थ्यांना पदव्‍युत्तर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ ओढावेल. यासंदर्भात तातडीने निर्णय होऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता शिष्यवृत्ती अखंडितपणे सुरू रहायला हवी."

- प्राचार्य डॉ.राजेंद्र भांबर, अधिसभा सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

students frustrated
Foreign Education : उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर द्यावी लागेल ही परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com