SAKAL Exclusive : असमानी संकटाशी लढत बळीराजा पुन्हा खरीपाच्या तयारीला! भाजीपाला लागवडीची तयारी सुरू

Agriculture news Kharif season crop of farmers
Agriculture news Kharif season crop of farmersesakal

SAKAL Exclusive : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळींप्रमाणे बळीराजा पुन्हा उभा राहून खरीपाच्या तयारीला लागला आहे.

मागच्या संपूर्ण हंगाम अस्मानी अन् सुलतानी संकटात बळीराजा पूर्णतः कोलमडून गेला. तरी पण शेतीसाठी मातीसाठी अन् संसारासाठी पुन्हा उभे राहत खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीची तयारी सुरू केली आहे. (SAKAL Exclusive Fighting inequality crisis Baliraja prepares for Kharif again Preparations for vegetable planting underway nashik news)

भाजीपाल्याची लागवड करणारे शेतकरी यंदा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन द्विधा मनःस्थितीत आहेत. जूनमध्ये कमी पावसाच्या अंदाजाने शेतकरी चिंतेत आहेत. तरीदेखील दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजीपाल्याच्या रोपांची बुकिंग करून ठेवली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी भाजीपाला लागवड करतात. प्रामुख्याने टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरची, वांगी, कारले, दोडके आदी प्रकारच्या भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो.

जमिनीची मशागत करण्याची लगबग

ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असते ते शेतकरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाजीपाल्याची लागवड करतात. आताच जमिनीची मशागत व जमीन खते टाकून तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. प्रामुख्याने टोमॅटो, ढोबळी मिरची व तिखट मिरचीची मोठी लागवड शेतकरी करतात. त्यासाठी जमिनीत एकरी चार ट्रॉली शेणखत किंवा सेंद्रिय खत टाकून गादी वाफे पाडून ठेवणे सुरू आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी आताच मल्चिंग पेपर अंथरूण ठेवला आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यात लागवड केलेला भाजीपाला साधारण: जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात दाखल होईल. अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

--

--चौकट--

रोपांचे दर व एकरी संख्या

टोमॅटो : १.२० पैसे ते १.५० पैसे काडी व एकरी सात हजार काडी

ढोबळी मिरची : २.३० पैसे ते २.५० पैसे काडी व एकरी दहा ते बारा हजार काडी

मिरची : १.२० पैसे ते १.४० पैसे काडी व एकरी सहा ते साडेसहा हजार

झेंडू : २.३० पैसे ते ३.०० रू. एकरी सहा ते सात हजार काडी

कोबी : १ रुपये ते १.२० पैसे काडी व एकरी वीस हजार काडी

--

फोटो : B01685

--कोट--

दरवर्षी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतो. तीन दिवसांपूर्वी एक एकर जळगाव भरीत वांग्याची लागवड केली आहे. २५ मेस एक एकर टोमॅटो ची लागवड करायची आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. जमिनीत एकरी वीस गोणी सेंद्रिय कृषी अमृत खत टाकून रोटर मारून जमीन तयार करून ठेवली आहे.

किशोर गोजरे,

युवा शेतकरी, वडगाव पंगू (ता. चांदवड)

--

फोटो : B01684

--कोट--

मागचं पूर्ण वर्ष शेतकऱ्यांचे वाया गेले. आता शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहे. तरी देखील भाजीपाल्याची लागवड दरवर्षीप्रमाणेच होईल. शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या रोपांची बुकिंग केली आहे.

-मधुकर गवळी,

नर्सरी व्यावसायिक, उगाव (ता. निफाड)

Associated Media Ids : NMN23B01684, NMN23B01685

---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com