SAKAL Exclusive : मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह! शेतीसाठी साहित्य वेळेत मिळणार

Mahadbt Scheme
Mahadbt Schemeesakal

SAKAL Exclusive : मागेल त्याला शेततळे योजनेच्या यशानंतर आता कृषी विभागाने मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट-हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना याच पोर्टलद्वारे अनुदान वाटप होणार आहे. यामुळे शेतकरी लाभाच्या योजनांना गती मिळू शकेल. (SAKAL Exclusive Materials for agriculture will be available in time through mahadbt portal nashik news)

शेतकऱ्यांना आवश्यक घटकांची मागणी केल्यावर तातडीने उपलब्धता झाल्यास नक्कीच शेती उत्पादनात वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती.

त्यालाच अनुसरून आता मागेल त्याला फळबाग, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, हरितगृह पेरणी यंत्रे शेततळ्याच्या अस्तरीकरण हे साहित्य उपलब्ध होणार असल्याने याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

सध्या सुरू असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग देण्यात येईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास एकात्मिक फलोत्पादन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन, बिरसा मुंडा कृषी क्रांती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेततळ्याचे अस्तरीकरण केले जाणार आहे. याच योजनांमधून मागेल त्याला शेडनेट व हरितगृह देखील मिळणार आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे साहित्य मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविली जाणार असून या बदलाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.

१६-१

पन्नास कोटींचा निधी मंजूर

शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक योजनांसाठी २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सूचना योजना राबविण्यासाठी ३५० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनसाठी दहा कोटी रुपये तर वैयक्तिक शेततळ्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आला आहे. मंजूर लाभार्थ्यांना या निधीचे महाडीबीटीमार्फत वितरण होणार आहे.

१६-१

नाव लागावे सार्थकी...

योजनेचे नाव मागेल त्याला असले तरी अनेक शेतकरी यापूर्वीही विविध योजनांसाठी अर्ज करून देखील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. किंबहुना मागेल त्याला शेततळे योजनेतही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाने मागेल त्याला...हे नाव देताना खरोखर पात्र ठरेल, त्याला तातडीने लाभ देण्याची गरज आहे. लकी ड्रॉ पद्धतीने लाभ देत गेल्यास निम्म्याहून अधिक शेतकरी दरवर्षी वंचितच राहतात, असे या योजनेच्या बाबतीत व्हायला नको अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

-----------------

कोट

शासनाने शेतकरी हितासाठी अतिशय दमदार पाऊल उचलली आहेत. मागेल त्याला योजनेचा लाभ मिळणार असल्याने नक्कीच अधिकाधिक शेतकरी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन शेतीत प्रगती करू शकतील हा विश्वास आहे.

- नानासाहेब लहरे, संघटन सरचिटणीस, भाजपा, येवला.

------------------===================

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com