SAKAL Exclusive: वरुणराजा अजूनही रुसलेलाच! जिल्ह्यातील अवघ्या 12 मंडळांत गाठली सरासरी

अद्याप केवळ 34 टक्केच पाऊस
Maize, cotton crop that blooms on short rains
Maize, cotton crop that blooms on short rainsesakal

SAKAL Exclusive : पाऊस लबाड.. ढगांच्या आड दडतो..,पाऊस अवेळी कोपरखळी काढतो...या काव्यपंक्तीप्रमाणे चित्र असल्याने जिल्ह्यावासीयांना आकाशाकडे पाहण्याची वेळ वरुणराजाने आणली आहे.

यंदा पावसाळ्याच्या दोन महिन्यांत केवळ रिमझिम सुरू असल्याने जिल्ह्यातील आजपर्यंतच्या महसूल मंडळांची आकडेवारी चिंताजनक आहे.

आतापर्यंत पर्जन्याची सरासरी केवळ १२ मंडळांनी पार केली आहे, तर २० हून अधिक मंडळांची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमीच आहे. यामुळे रिमझिमवर फुललेल्या पिकांसाठी आता मुसळधारेची अत्यावश्यकता आहे. (SAKAL Exclusive monsoon rain Average achieved in only 12 circles in district nashik)

भौगोलिकदृष्ट्या विभाजन, पर्जन्यछायेचा प्रदेश आणि पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन यांसह विविध भौगोलिक कारणांमुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. त्यातच जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड व देवळा तालुक्यांत नेहमीच पावसाची मात्रा रुसलेली दिसते.

त्यातच जिल्हा दर वर्षीच पर्जन्याच्या बाबतीत पूर्व व पश्चिम भागात विभागला जातो. राज्यात अनेक जिल्ह्यतंत धो-धो पाऊस पडत असताना नाशिकला मात्र अद्यापही रोजच आकाशाकडे पाहण्याची वेळ येत आहे.

सिन्नरच्या पूर्व भागात तर आत्ताशी पेरणी सुरू आहे, जिल्ह्यात खरिपाची पेरणी मार्गी लागली असली तरी रिमझिमीवर पिके हिरवीगार नावालाच आहेत. मुसळधारेअभावी पिकांची वाढ खुंटली असून, आळी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

जूनसह जुलै संपला तरी नदी, नाले, धरणे कोरडेठाक असल्याने जलस्रोतांनाही पाणी उतरले नाही. परिणामी पिण्यासाठीही टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. आतापर्यंतच्या पर्जन्याची सरासरी केवळ दिंडोरी तालुक्याने (११६ टक्के) पार केली आहे.

याशिवाय ७० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान नऊ तालुक्यांत पाऊस पडला आहे. सर्वात कमी चांदवडमध्ये आतापर्यंतच्या पर्जन्याच्या तुलनेत ४९, तर सिन्नरमध्ये ५५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात जूनपासून आजपर्यंत सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीचा विचार केला तर जिल्ह्यातील सर्वच तालुके ३० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान असून, जिल्ह्याची एकत्रित सरासरी केवळ ३७ टक्केच आहे. जिल्ह्याची मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी तब्बल ११२ टक्के होती हे विशेष!

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maize, cotton crop that blooms on short rains
Nashik Monsoon Rain: माळमाथा परिसराला पावसाने झोडपले! कळवाडीत जोरदार पाऊस

निम्मे मंडळे अडचणीत

जिल्ह्यातील ९७ महसूल मंडळापैकी ननाशी मंडळात सर्वाधिक ३१६ मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय कोशिंबे, कसबे वणी, इगतपुरी, पेठ, अंदरसूल, कळवाडी, निमगाव, मुल्हेर, कनाशी, दळवट, सुरगाणा या मंडळांत आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे.

या उलट वडांगळी मंडळात जिल्ह्यातील सर्वाधिक कमी १७ टक्के पाऊस पडला आहे. वावीमध्ये २७ व दुगावमध्ये २८ टक्केच पावसाची नोंद झाली. ५० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाची तब्बल २० महसूल मंडळात नोंद असून ५० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान ६५ महसूल मंडळांत पाऊस पडला आहे.

एकूणच निम्म्या मंडळात सद्यःपरिस्थिती बिकटच आहे. अर्थात हे सर्व आकडे अधूनमधून येणाऱ्या सरी आणि एखाद दोन मोठ्या पावसामुळेच फुगलेले दिसतात हेही नक्की.!

- जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान- ९३३ मिमी

- जून-जुलैचे सरासरी पर्जन्यमान- ४६३ मिमी

- आजपर्यंत पडलेला पाऊस- ३१६ मिमी

- वार्षिक टक्केवारी- ३४ टक्के

- जून-जुलैची टक्केवारी- ६८ टक्के

Maize, cotton crop that blooms on short rains
Workout In Monsoon : बाहेर सतत पाऊस पडतोय, मग घरातच करा हे एक्सरसाईज, Gym Workout प्रमाणे कॅलरी होतील बर्न

आजपर्यंत पडलेला पाऊस मिमीमध्ये...

तालुका - आजपर्यंतचा पाऊस - वार्षिक सरासरीच्या टक्के

मालेगाव - १८१ - ३९

बागलाण - १८७ - ३८

कळवण - २८२ - ४४

नांदगाव - १३६ - २८

सुरगाणा - ८६२ - ४५

नाशिक - २१० - ३०

दिंडोरी - ३८९ - ५७

इगतपुरी - ९६९ - ३२

पेठ - ९१० - ४४

निफाड - १५४ - ३३

सिन्नर - १३७ -२६

येवला - १५४ -३४

चांदवड - १२७ -२४

त्रंबकेश्वर - ८२६ - ३८

देवळाली - १४१ - ३३

Maize, cotton crop that blooms on short rains
Monsoon Tourism: शहरात पर्यटकांची मांदियाळी..! बसस्‍थानकावर गर्दी, धार्मिक-निसर्ग पर्यटनाला चालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com