रॉक बँडच्या तालावर रंगणार ‘सकाळ गरबा फेस्ट

रॉक बँडच्या तालावर रंगणार ‘सकाळ गरबा फेस्ट
Published on: 
(लोगो श्री. निखिल यांच्याकडून घेणे - सकाळ गरबा फेस्ट आणि लोटस लँड आणि फोर्टी फोर हझर्ड द बँड चे ) रॉक बँडच्या तालावर रंगणार ‘सकाळ गरबा फेस्ट ---------------------------------------- गरबाप्रेमींसाठी १८ व १९ ला रंगणार नृत्य, संगीत सोहळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : नवरात्रोत्सव म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, ढोल-ताशांचा गजर, तालबद्ध गरबा आणि दांडियाचा उत्साह! यंदाच्या नवरात्रोत्सवात नाशिककरांना गरब्याचा एक वेगळाच अनुभव देण्यासाठी ‘सकाळ मीडिया ग्रुप’तर्फे ‘सकाळ गरबा फेस्ट २०२६ - गरबा विथ रॉक बँड’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेणू पार्टनर म्हणून लोटस लँड लान्स तसेच फोर्टी फोर हझर्ड द बँड यांचे बँड पार्टनर म्हणून सहकार्य लाभले आहे. रविवार (ता.१८) आणि सोमवारी (ता.१९) हा उत्सव रंगणार असून, पारंपरिक गरब्याची संस्कृती आणि आधुनिक संगीताचा जोश यांचा अनोखा संगम यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. या महोत्सवात पारंपरिक गरब्याच्या रंगतदार फेऱ्या, दांडियाचा उत्साह, आकर्षक पारंपरिक वेशभूषा आणि संगीताच्या तालावर थिरकण्याची संधी मिळणार आहे. नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक परंपरा जपत आधुनिक मनोरंजनाची अनुभूती देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. मित्र परिवार, कुटुंबीय आणि गरबाप्रेमींना एकत्र आणणारा हा महोत्सव नाशिकच्या सांस्कृतिक उत्सवांमध्ये विशेष रंगत निर्माण करणार आहे. नवरात्रीच्या उत्साहात सहभागी होत रॉक बँडच्या तालावर गरब्याचा नवा अनुभव घेण्यासाठी नाशिककरांनी सज्ज व्हावे तसेच तिकिटासाठी शरद धात्रक (मो. ९८९००१११२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इन्फो... कुठे? आणि कधी? सकाळ गरबा फेस्ट २०२६ तारीख : १८ व १९ ऑक्टोबर स्थळ : लोटस लँड, गंगापूर रोड, नाशिक विशेष आकर्षण: सेल्फी झोन, विशेष पारितोषिके, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य अशी अनेक पारितोषिके जिंकण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com