SAKAL Impact: अखेर नळावाटे पिण्यायोग्य पाणी; NMC पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशी शोधला दोष

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

SAKAL Impact : कोणत्याही कामाला प्रामाणिकपणाची व जिद्दीची जोड असल्यास ते काम चांगले व त्वरित होते, याचा प्रत्यय पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथील रहिवाशांना आला.

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यावर मनपा पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्याने सुटीच्या दिवशी दिवसभर उभे राहून यातील दोष शोधून काढल्याने अखेर तब्बल महिन्यानंतर नागरिकांना गटारमिश्रित पाण्यापासून सुटका झाली आहे. (SAKAL Impact Finally potable tap water NMC water supply officials discovered fault on holiday nashik)

पंचवटीतील गणेशवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळावाटे चक्क गटारमिश्रित पाणी येत होते. या पाण्याला दुर्गंधीही येत असल्याने जुलाब, उलट्या असे आरोग्याचे प्रश्‍नही उपस्थित होऊ लागले होते.

याबाबत ‘सकाळ’ ने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर महापालिका पंचवटी विभागीय पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंते दत्तात्रेय बागूल यांनी गटारीचे पाणी नळाच्या लाइनमध्ये कोठे शिरते, याबाबत पाठपुरावा सुरू केला.

मात्र तरीही नळावाटे दूषित पाणी सुरूच होते. याबाबतचे वृत्त १६ जुलैला पुन्हा सकाळमध्ये प्रकाशित झाल्यावर श्री. बागूल व त्यांच्या टीमने रविवारची सुटी असूनही दिवसभर उभे राहत दूषित पाणी कोठून मिसळते, ते शोधून काढले, त्यामुळे नागरिकांना सोमवार (ता. १७) सकाळपासून चांगल्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
Nashik Monsoon Crisis: जुलैत गेल्यावर्षी पेक्षा 127 टक्के कमी पाऊस; धरणांच्या तालुक्यातही दमदार पावसाची प्रतीक्षा

दूषित पाणीपुरवठा बंद झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला दूषित पाणीपुरवठा बंद झालेला असलातरी या भागात अधिक दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आहे.

कारण परिसरात विद्युत मोटारी सुरू झाल्यावर अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित होतो, त्यामुळे योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आहे.

"कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यास त्याचा आनंदही तेवढाच मोठा असतो. प्रत्येकाला स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे हे काम महत्त्वाचे मनपाचे अधिकारी म्हणून माझे कर्तव्यच आहे."

- दत्तात्रेय बागूल, कनिष्ठ अभियंते, पाणीपुरवठा विभाग

NMC Nashik News
Mumbai News : मुंबईत नाशिक महामार्गावरील खडवली फाटा बनला मृत्युचा सापळा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.