SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

Changed form of Saigram Park.
Changed form of Saigram Park.esakal

सिडको (जि. नाशिक) : प्रभाग २७ मधील साईग्राम उद्यानाची दुरवस्थेबाबत वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर उद्यान विभागाकडून समस्या सोडवण्यास तातडीने पाऊल उचलली आहे. येथील स्वच्छतेवर भर देण्यात आला असून, उद्यानातील लॉन्सवरदेखील खत व युरिया टाकण्यास सुरवात झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (SAKAL Impact News problem solved at Saigram Park nashik news)

सिडको परिसरातील साईग्राम उद्यानाची स्वच्छता करण्यास सुरवात झाली असून येथील पालापाचोळा एका ठिकाणी गोळा करण्याच्या कामास वेग मिळाला आहे. येथील खेळणी लवकरात लवकर दुरुस्ती करणार असून येथील ग्रीन जिमचे साहित्यदेखील त्वरित दुरुस्त करणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या समस्या दूर होत असताना मात्र रात्री मद्यपी व रोडरोमिंयोच्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर उद्यानात येऊन बसणाऱ्या प्रेमीयुगुलांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी मात्र आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Changed form of Saigram Park.
Nashik News : दलित वस्तीच्या विकासकामांना 31 कोटींचा निधी!

"उद्यानातील गाजरगवत व पालापाचोळा उचलण्यास सुरवात झाल्याने उद्यान चकाचक झाले आहे. येथील खेळणी व ग्रीन जिमदेखील लवकरच सुधारणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. येथील मोठ्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यादेखील लवकरात लवकर छाटण्यात याव्यात."- संध्या जाधव, गृहिणी

"उद्यान समस्या सुटत असल्यामुळे ‘सकाळ’चे मनापासून आभारी आहोत. उद्यान परिसरात येणारे मद्यपी, प्रेमीयुगुल व उद्यानाबाहेरील रोडरोमिंयोवरदेखील कठोर शासन व्हायलाच हवे."
- मनाली पाटील, गृहिणी

Changed form of Saigram Park.
Nashik News : आठवीचे 765, पाचवीचे 833 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक; शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com