SAKAL Impact: ‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाइन जाहीर! पुढील प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा

SPPU
SPPUesakal
Updated on

SAKAL Impact : एचपीटी महाविद्यालयातील बी.ए. पदवी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाचे निकाल प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आली होती.

यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ऑनलाइन स्वरूपात निकाल जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. (SAKAL Impact Results of SPPU HPT College students announced online way for further entry clear nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

SPPU
PM Modi on Health Emergency: "आगामी आरोग्य आणीबाणीसाठी तयार राहा"; PM मोदींनी का केलंय हे आवाहन?

इतर महाविद्यालयांतील अंतिम वर्ष बी.ए.चा निकाल जाहीर झालेला असताना एचपीटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित होता.

याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तातडीने निकाल जाहीर करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली.

प्रलंबित निकाल असलेले विद्यार्थीही उपस्थित होते. दरम्यान, दुपारी उशिरा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

SPPU
Vastu Tips for Students: लहान मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होत नाहीये? मग वास्तूशास्त्राचे हे उपाय ठरतील फायदेशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com