SAKAL Impact: खेडलेझुंगे गोदापात्रातील हिरव्या रंगाच्या पाण्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतले नमुने

Extensive green layer along the Khedlejunge in Goda Patra
Extensive green layer along the Khedlejunge in Goda Patraesakal

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : खेडलेझुंगे (ता. निफाड) येथील गोदापात्रात केमिकलयुक्त रासायनिक द्रव्ये टाकलेल्या हिरव्या रंगाच्या पाण्याचे नमुने आज तपासणीसाठी घेण्यात आले आहे. नाशिकच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण शाखेच्या पथकाने गोदावरी नदीच्या पात्रातील दुर्गंधीयुक्त पाणी नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.

या प्रथकाने आधी रासायनिक द्रव्ये असलेल्या पाण्याची तपासणी साधारण आली होती, मात्र आता गोदावरी नदीतील रासायनिक द्रव्याची स्थिती गंभीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदीपात्रात हिरव्या रंगाचा थर अन् छटा गडद होत आहेत. (SAKAL Impact Sampling of green colored water from Khedlejunge Godapatra by Pollution Control Department nashik news)

नाशिक पाटबंधारे विभागाच्या सोमठाणे शाखेने या प्रकरणाचे गांभीर्य ओखळत लासलगाव पोलिस ठाण्याला लेखीत स्वरूपात माहिती कळविली आहे. खेडलेझुंगेला शनिवारी (ता.१४) मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

यापूर्वी गोदावरी नदीपात्रात केमिकलयुक्त रासायनिक द्रव्ये असलेल्या गोण्या आढळून आल्या होत्या. त्यावेळी गोदावरी पात्रातील पाण्याचा रंग बदलेला नव्हता असे स्थानिक सांगतात. त्यावेळी पाणी नमुने गोळा करून तपासले.

पहिल्या घटनेच्या रिपोर्ट येण्यापूर्वी पुन्हा अधिक प्रमाणात केमिकल युक्त रासायनिक द्रव्ये टाकण्यात आले.त्यांचा परिसरात खेडलेझुंगे पासून ते कानदळसाच्या साठवण बंधारा पर्यंत दोन किलोमीटर परिघात दिसत आहे.

सकाळ प्रतिनिधीने संबंधित यंत्रणेला दूरध्वनीने याबाबत कळविले. त्यानंतर रविवारी (ता.१५) सायंकाळी साडे चारच्या दरम्यान पुन्हा पथकाने पाणी नमुने गोळा केले आहेत. खेडलेझुंगे गावाच्या बाजूने हिरव्या रंगाचा थर प्रमाण जास्त आहे.

तेथे पथकाने पाणी नमुने गोळा करून पुन्हा तपासणीला पाठविले आहे. खेडलेझुंगे कोळगाव व कानदळ या तीन गावांची पिण्याची पाणी योजना नाही. मात्र निफाडच्या तहसीलदार प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींना कळवून माहिती घेतली आहे.

गोदावरी पात्रात रासायनिक द्रव्यामुळे आलेली दुर्गंधी अधिक आहे. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे, सांगवी, चोंढी-मेंढी भागातील शेतकऱ्यांच्या खासगी शेती पाईपलाईन आहेत. खेडलेझुंगे ते कानदळस बंधारा सोमठाणे गोदावरी सिंचन शाखेच्या हद्दीत आहे. या ठिकाणी या गावांतील दशक्रिया विधी होतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Extensive green layer along the Khedlejunge in Goda Patra
Nashik News : वक्फ संस्थाविश्वस्तांना द्यावा लागणार वार्षिक अर्थसंकल्प; 30 दिवसांची मुदत

सोमठाणे गोदावरी सिंचन शाखेचे शाखा अभियंता ओमकार भंडारी यांनी आज लासलगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेतली. त्यांनी पहिल्या पाणी नमुने तपासणीच्या प्रती दिल्या. त्यात पहिला अहवाल साधारण असल्याचे सांगितले आहे. मात्र पुन्हा शनिवारी घटना घडल्याची माहिती दिली आहे.

"सोमठाणे पाटबंधारे विभागाने खेडलेझुंगेच्या गोदावरी नदीच्या पात्रातील रासायनिक द्रव्य टाकल्याविषयी आधी नमुने घेतले. त्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल लासलगाव पोलिस ठाण्याला रितसर लेखी स्वरूपात कळविला आहे."

- ओमकार भंडारी, शाखा अभियंता, सोमठाणे गोदावरी सिंचन विभाग नाशिक.

"खेडलेझुंगेला सातत्याने गोदावरी नदीपात्रात केमिकलयुक्त रासायनिक द्रव्ये टाकण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित दोषींवर कारवाई झाली पाहिजे."

- विजय सदाफळ, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते, खेडलेझुंगे.

Extensive green layer along the Khedlejunge in Goda Patra
Nashik News : पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com