SAKAL Impact : अवलियाच्या मदतीला ज्येष्ठांनी दिला हात! जय श्रीराम जॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी केले मैदान साफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Senior Citizens of Jai Shriram Group collecting tares and tares on the Pawannagar ground

SAKAL Impact : अवलियाच्या मदतीला ज्येष्ठांनी दिला हात! जय श्रीराम जॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी केले मैदान साफ

नाशिक : सिडकोतील पवन नगर मैदान येथे शिवजयंतीनिमित्ताने उभारलेला देखावा काढल्यानंतर मैदानात मोठ्या प्रमाणात खिळे तारा विखरून पडलेले होते. यामुळे मैदानावर येणाऱ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता होती.

मात्र एका अवलियाने मैदानावरील लहान-मोठे खिळे, चुका, तारा गोळा केले. या संदर्भातील वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच शुक्रवारी (ता.३) मैदानावर जॉगिंग, व्यायामासाठी येणाऱ्या ‘जय श्रीराम ग्रुप’च्या ज्येष्ठ नागरीकांनी नित्यनेमाच्या व्यायामाला फाटा देत मैदानावरील खिळे, चुका, तारा गोळा करीत त्या अवलियाला साथ दिली. (SAKAL Impact Seniors helped chandrashekhar jangale in removing nails Members of Jai Shriram Joggers Group cleaned grounds nashik news)

सकाळची बातमी

सकाळची बातमी

शिवजयंतीच्या निमित्ताने सिडकोतील पवननगर मैदानावर किल्ल्याचा देखावा उभारण्यात आला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी सदरचा देखावा काढण्यात आला. देखावा उभारताना मोठ-मोठे व लहान खिळे, तारा, चुका, स्टेपलर पिना यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला होता.

देखावा काढताना ठोकलेले खिळे, बांधलेल्या तारा या काढण्यात आल्या, पण संबंधित कामगारांनी ते जमा न केल्याने मैदानावरच ते विखरलेले होते. यामुळे मैदानावर व्यायामासाठी, जॉगिंगसाठी येणाऱ्या शेकडो, महिला-पुरुषांना तसेच हिरे विद्यालयाची मुलेही याच मैदानावर खेळण्यासाठी येतात.

या विखुरलेल्या खीळयामुळे अनेकांच्या पायाला इजा होण्याची जास्त शक्यता होती. ही बाब ओळखून अवलिया अर्थात चंद्रशेखर जंगले यांनी गेल्या दोन दिवसांपासून मैदानावरील खिळे, तारा, चुका गोळा करीत होते.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

या संदर्भातील वृत्त ‘मैदानातील खिळे गोळा करणारा अवलिया’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये शुक्रवारी (ता.३) बातमी प्रसिद्ध झाली. या वृत्ताची दखल घेत मैदानावर नित्यनेमाने जॉगिंग व्यायामासाठी येणाऱ्या जय श्रीराम ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यायामाला फाटा देत मैदानावरील खिळे गोळा करीत चंद्रशेखर जंगले यांच्यासमवेत निःस्वार्थ सेवेला हातभार लावला.

जंगले यांनी यासाठी कोणालाही आवाहन केले नव्हते. परंतु बातमी वाचून जय श्रीराम ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांनी हाताला हात लावीत मैदानावरील खिळे व इजा पोहोचू शकतील, अशा वस्तू गोळा केल्या.

असे काम केल्याचे विशेष समाधानही लाभल्याच्या भावना या ज्येष्ठ नागरीकांनी व्यक्त केल्या. तसेच, जंगले जे काम करीत आहेत, त्यासाठी कोणतीही मदत लागल्यास उभे राहण्याचा शब्दही या ज्येष्ठ नागरीकांनी दिला. जंगले यांनाही समाधान वाटले.

टॅग्स :Nashiksakal impact news