SAKAL Impact : ऑनलाइन तक्रारी कमी करण्याच्या सूचना

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

SAKAL Impact : नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिकेचे राज्य शासनाकडून विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले असतानाही जवळपास साडेसहाशेहून अधिक तक्रारी प्रलंबित असल्याची बाब ‘सकाळ’ ने समोर आणली होती.

त्याअनुषंगाने महापालिकेचे प्रभारी आयुक्त व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने तक्रारींचे निराकरण करून त्या कमी करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिल्या. (SAKAL Impact Tips to reduce online complaints nmc nashik news)

नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पीएम पोर्टल, आपले सरकार पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. यावर प्राप्त झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे अपेक्षित असताना त्या तक्रारी निकालात निघत नाही.

अतिक्रमण विभागाच्या ३२ तक्रारी, नगर नियोजन २०, मिळकत ४, सार्वजनिक बांधकाम विभाग ३, सार्वजनिक आरोग्य २, घनकचरा व्यवस्थापन ४, विद्युत विभाग १, भूसंपादन विभाग १ व सामान्य प्रशासन विभाग १.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC News : शहराला कोणी वाली आहे का? ना प्रशासन प्रमुख, ना लोकप्रतिनिधी; तक्रारींचा ढिग!

त्याचप्रमाणे एनएमसी ई-कनेक्ट ॲपवरदेखील पशुसंवर्धन १३६, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग १३२, अतिक्रमण १०६, घनकचरा व्यवस्थापन ९९, सार्वजनिक बांधकाम ११, विद्युत व यांत्रिकी ५१, सार्वजनिक आरोग्य ४२,

उद्यान ४९ या विभागांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याची बाब ‘सकाळ’ने समोर आणली. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त गमे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

NMC Nashik News
NMC Sewage Treatment Plant : औद्योगिक सांडपाण्यात केमिकल, जड घटक! महापालिकेच्या आऊटलेटला जोडण्यास नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com